…तर प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्री असते, रामदास आठवले यांनी थेट भावनेलाच घातला हात, रिपब्लिकन ऐक्याचं स्वप्न पूर्ण होणार का?

…तर प्रकाश आंबेडकर उपमुख्यमंत्री असते, रामदास आठवले यांनी थेट भावनेलाच घातला हात, रिपब्लिकन ऐक्याचं स्वप्न पूर्ण होणार का?

रिपब्लिकन ऐक्य हे तर समाजाचं स्वप्न आहे. विविध गटा तटात विखुरलेल्या नेत्यांनी एक मोट बांधून निवडणुकीला सामोरं जावं अशी समाजाची इच्छा आहे. यापूर्वी पण अनेकदा रिपब्लिकन ऐक्याचे हाकारे देण्यात आले. चार दिशेला चार मतांपेक्षा एकत्र येत सत्ताधारी जमातीचे स्वप्न अजून समाज ऊराशी बाळगून आहे. आता विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा या मुद्याला हवा दिली आहे. त्यांनी रिपब्लिकन ऐक्याचा नारा दिला आहे. त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना भावनिक साद घातली आहे.

तर ते उपमुख्यमंत्री असते

प्रकाश आंबेडकर एवढ्या निवडणुका लढवूनही त्यांच्या पक्षाला मान्यता मिळत नाही. निवडून येत नाही. त्यामुळे त्यांनी एनडीएमध्ये यावे. त्यांना मंत्रीपद देण्यासाठी मी मदत करेल. प्रकाश आंबेडकर माझ्या सोबत राहिले असते तर उपमुख्यमंत्री बनू शकले असते.
आम्ही दोघे एकत्र असतो तर त्याचा मोठा फायदा झाला असता. त्यांनी माझ्या सोबत यायला पाहिजे. त्यामुळे बहुजन एकत्रित येतील त्यांच्या भूमिकेशी मी सहमत आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या सोबत यावं. त्यांनी सोबत यायला पाहिजे एकटे राहून सत्तेत येता येत नाही, असे सत्तेचे गणित सुद्धा रामदास आठवले यांनी मांडले.

सगळ्या गटांना एकत्रित येण्याचे आवाहन

रिपब्लिकन पक्षाचा एकीकरण करण्यासाठी सगळ्या गटांनी एकत्रित येण्याची गरज आहे. फक्त एकट्याने किंवा दोघांनी येऊन चालणार नाही. प्रकाश आंबेडकर जर पुढाकार घेत असतील तर मी अध्यक्षपदासाठी आग्रही राहणार नाही. माझी पॉझिटिव्ह भूमिका आहे. आणि माझा त्याला पाठिंबा आहे. माझा त्यांना पाठिंबा असेल. प्रकाश आंबेडकर शिवाय रिपब्लिकन ऐक्य शक्य होणार नाही, असे त्यांनी ठासून सांगितले.

तर आठवलेंची वेगळी भूमिका?

उद्धव ठाकरे हे युती मध्ये असताना त्यांच्या जागा निवडून आल्या होत्या मात्र त्यावेळी 3 दोनचा फॉर्म्युला स्वीकारा असं मी म्हटलं होतं. मात्र त्यावेळी तो दोघांनी सुद्धा स्वीकारला नाही. मात्र उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे जाण्याला पसंती दिली, असं ते म्हणाले.

आमची ताकत कमी आहे असं समजू नये आमची ताकत गाव पातळी पर्यंत आहे. याचा विचार करावा आणि आमच्यासाठी झुकत माप घ्यावं असे आवाहन त्यांनी महायुतीला केलं आहे. राजकारणात वैचारिक फटके देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असा इशारा सुद्धा आठवले यांनी यावेळी दिला. त्यामुळे आठवले वेगळी राजकीय भूमिका घेतील का? असा प्रश्न समोर येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;