धारावीकरांचा पोलीस स्टेशनला घेराव; खासदार वर्षा गायकवाड घटनास्थळी, नेमकं काय घडतंय?

धारावीकरांचा पोलीस स्टेशनला घेराव; खासदार वर्षा गायकवाड घटनास्थळी, नेमकं काय घडतंय?

मुंबईतील धारावी भागात आज तणावपूर्ण वातावरण आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धारावीतील मस्जिदचा अनधिकृत भाग पाडला. त्यामुळे धारावीत मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला आहे. संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या वाहनांचीही तोडफोड केल्याचं समोर आलं आहे. पालिकेच्या पथकाच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. धारावीतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

धारावीत नेमकं काय झालं?

आज सकाळी मुंबई महापालिकेचं पथक धारावीत दाखल झालं. बीएमसीचं पथक धारावीत आल्यानंतर काही नागरिकांनी त्यांना अडवलं. संतप्त नागरिकांनी बीएमसीच्या वाहनाच्या काचा फोडल्या. तर रस्ताही अडवण्यात आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत बंदोबस्त वाढवला. स्थानिकांनी चर्चा करत पोलिसांनी तणावपूर्ण परिस्थितीवर मार्ग काढायला सुरुवात केली.

वर्षा गायकवाड धारावीत

मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त धारावीत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. खासदार वर्षा गायकवाडदेखील धारावी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. पोलीस अधिकाऱ्यांशी बोलत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसंच ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बातमी अपडेट होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;