Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : भडकाऊ वक्तव्य, केंद्रात तक्रार, अजित दादा vs नितेश राणे, पाहा Video

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : भडकाऊ वक्तव्य, केंद्रात तक्रार, अजित दादा vs नितेश राणे, पाहा Video

बुलडाण्यात अजित पवारांनी मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांच्या समोर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांनाच सुनावलंय. अजित पवारांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची थेट तक्रारच भाजपच्या दिल्लीतल्या हायकमांडकडेही केलीय. मात्र अजित पवारांना कुठं तक्रार करायची करु द्या, म्हणत नितेश राणेंनीही इरादे स्पष्ट केलेत. म्हणजेच आता अजित पवार आणि नितेश राणे आमनेसामने आलेत. बुलडाण्यातून अजित पवारांनी नाव न घेता, नितेश राणे, संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंना फटकारलं. पण, सांगलीतून पुन्हा नितेश राणेंनी भडकावू भाषण केलंच. एक दिवस पोलिसांना सुट्टी देतो. मुस्लिमांनी ताकद दाखवावी. मग कळेल पुढची सकाळ हिंदू बघतो की मुसलमान अशी चिथावणी नितेश राणेंनी दिलीय.

विशेष म्हणजे, अजित पवारांचा सर्वाधिक आक्षेप नितेश राणेंच्याच वक्तव्यावर आहे..त्यावरुनच दादांनी आता दिल्लीतल्या भाजपच्याच हायकमांडकडे तक्रारही केली. हिंदू जनआक्रोश मोर्चातून नितेश राणेंचं मशिदीत घुसून मारण्याचं प्रक्षोभक वक्तव्य असो की मग शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांचं राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा अजित पवार अशा वक्तव्यावरुन संतापलेत.

पाहा व्हिडीओ:-

अजित पवारांनी भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांसह केंद्राच्या नेत्यांकडेही तक्रार केल्याचं दादांचेच मंत्री धनंजय मुंडेंनीही सांगितलंय. तर, केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांनी त्यावर काय सांगितलं हेही दादांनाच विचारलं पाहिजे, असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावला. भाजप आणि शिंदेंची शिवसेना महायुतीतले दोन्ही पक्ष हिंदुत्वावादी म्हणून ओळखले जातात…मात्र अजित पवारांची राष्ट्रवादीला महायुतीचा तसा रंग लागलेला नाही. त्यामुळंच धार्मिक ध्रुवीकरण किंवा हिंदू-मुसलमानावरुन चिथावणीची भाषा होते तेव्हा अजित पवार तात्काळ रिअॅक्ट होतात. मात्र नितेश राणेंनीही दादांना कुठं तक्रार करायची करु द्या म्हणत, ऐकणार नाही असेच संकेत दिलेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;