Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : लाडक्या बहि‍णींचे साड्यांसाठी हाल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बहिणीच्या धर्तीवर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजप नेते आता ठिकठिकाणी महिलांना मोफत साडी वाटपाचा
कार्यक्रम घेवू लागले आहेत. मात्र शून्य नियोजन मोफत वाटण्यासाठी आणलेल्या साड्यांहून जास्त आलेली गर्दी. त्यात
काही खराब निघालेल्या साड्यांचा आरोप आणि कार्यक्रमात अनेक महिलांवरच उपाशी राहण्याची वेळ आल्यानं हे
कार्यक्रम टीकेचे धनी बनले आहेत.

नांदेडच्या हदगावातल्या जगापूरमधली ही दृश्यं आहेत. इथं भाजपकडून विधानसभेला इच्छूक असलेल्या कैलास राठोडांनी मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम ठेवला. मात्र महिलांच्या गर्दीमुळे इथं चेंगराचेंगरी होता-होता राहिली. कशी-बशी वाट काढून महिला गेटबाहेर पडत होत्या आणि गेटबाहेर उभे असलेले भाजपचे कैलास राठोड महिलांच्या हाती साडीची पिशवी थांबवत होते. हाल झालेल्या महिलांनी आयोजकांना शिव्या-शाप दिले. तर दुसरीकडे भाजपचे कैलास राठोड मात्र लाडक्या बहि‍णींना सन्मानासाठी हा कार्यक्रम केल्याचा दावा करत होते.

साड्या खराब निघाल्याच्या आरोपात अनेकांनी साड्यावाटप करणाऱ्या लोकांच्या अंगावरच त्या फेकून दिल्या. कार्यक्रमात महिलांचा आहे हे माहित असूनही गर्दी हाताळण्यासाठी महिला पोलिस दिसत नव्हत्या. ३ दिवसांपूर्वी नांदेडच्याच हदगावातल्या तामसा गावात असाच प्रकार घडला. साड्या कमी आणि महिला जास्त असल्यामुळे एकमेकांच्या हातून साड्या खेचण्याची स्पर्धाच रंगली. भाजपचे विधानसभा मंडळ प्रभारी भागवत देवसरकर यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. देवसरकर सुद्धा तिकीटासाठी इच्छूक असल्यामुळे तीनच दिवसात दुसरे इच्छूक कैलास राठोडांनी सुद्धा त्यांच्याच धर्तीवर मोफत साडीवाटपाचा कार्यक्रम हाती घेतल्याची चर्चा आहे.

एकीकडे सरकारमधले तिन्ही प्रमुख नेते लाडक्या बहिण योजनेच्या कार्यक्रम ठिकठिकाणी घेतायत. सरकारच्या वतीनं जाहिरातीद्वारे लाडक्या बहिण योजनेचा प्रचारही सुरुय आणि तिसरीकडे ज्या लाडक्या बहिणी योजनेसाठी पात्र ठरल्या. त्यांच्यासाठी विधानसभेला इच्छूक उमेदवार मोफत साड्या वाटपाचा कार्यक्रम राबवतायत पण नियोजनावरुन हे कार्यक्रम वादात सापडतायत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;