मोठी बातमी ! नवाब मलिक यांचा जावई कार अपघातात जखमी, डोक्याला गंभीर दुखापत

मोठी बातमी ! नवाब मलिक यांचा जावई कार अपघातात जखमी, डोक्याला गंभीर दुखापत

महाराष्ट्रातील दिग्गज नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मलिक यांचे जावाई समीर खान यांच्या कारचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत खान यांच्या डोक्याला दुखापत झाली. अपघातावेळी नवाब मलिक यांची कन्या आणि खान यांची पत्नी निलोफर यादेखील कारमध्येच होत्या. त्यांच्याही हाताला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. खार यांच्या थार कारला अपघात झाला. कार चालवताना ड्रायव्हरचा पाय ब्रेक ऐवजी ॲक्सीलेटरवर पडला आणि हा अपघात झाला असे समजते. याप्रकरणी पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतले असून त्याच्याविपोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कसा झाला अपघात ?

मिळालेल्या माहितीनुसार, नवाब मलिक यांची मुलगी निलोफर आणि जावई समीर खान हे दोघेही त्यांच्या घराजवळ असणाऱ्या क्रिटी केअर या हॉस्पिटलमध्ये रेग्युलर चेकअपसाठी गेले होते. त्यानंतर दोघेही रुग्णालयातून बाहेर आले आणि समीर खान यांनी ड्रायव्हला फोन करून कार घेऊन येण्यास सांगितले. मात्र कार आणताना ड्रायव्हरचा पाय ब्रेक ऐवजी ॲक्सीलेटरवर पजला आणि थार कार जोरात येऊन समीर खान यांना धडकली. यामध्ये समीर खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या ते आयसीयूमध्ये असून आणखी काही काळ त्यांना अंडर ऑब्झर्व्हेशन ठेवण्यात येणार आहे.

 

या अपघाता समीर खान यांच्या डोक्याला तसेच चेहऱ्यालाही दुखापत झाल्याचे समजते. कार चालकाने गाडीचा ॲक्सीलेटर दाबला त्यामुळे गाडी जोरात येऊन समीर खान यांच्यावर धडकली आणि ते कारसकट काही अंतर पुढे फरपटत गेले. ती कार पुढे जाऊन एचडीआयएल वसाहतीच्या भिंतीवर आदळली. कारमुळे ही बाईक्स देखील चिरडल्या गेल्यात. या प्रकरणात कार चालक अबुल अन्यारी याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;