जे उद्धव ठाकरेंनी केलं, ते करण्याची हिंमत तुमच्यात आहे का?; राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

जे उद्धव ठाकरेंनी केलं, ते करण्याची हिंमत तुमच्यात आहे का?; राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

आगामी विधानसभा निवडणुकीवर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. महायुती आम्हाला चर्चा करायची गरज नाही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष हा प्रमुख पक्ष आहे बाकीचे दोन उरलेले पक्ष हे आश्रित आहे. जेव्हा आश्रित असतात तेव्हा त्यांना आवाजत नाही. भाजपबरोबर स्वाभिमानाने लढलेली फक्त शिवसेना आणि प्रसंगी लाथ मारून उद्धव ठाकरे, आम्ही बाहेर पडलो. अशी हिंमत दुसऱ्या कोणामध्ये नाही. ही शिवसेनेमध्ये होती. आम्ही बाहेर पडलो. भाजपमध्ये दिल्लीतील गुजराती व्यापार मंडळ जे आहे. जे काही त्यांच्यासमोर ते येतील तुकडे ते त्यांना स्वीकारावे लागेल, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

स्वाभिमान अस्मिता हे विषय मुळात त्यांच्यासाठी संपलेले आहेत. जे काय मिळते ते गप्प पणे घ्या ही भारतीय पक्षाची भूमिका राहील. स्ट्राईक रेट काय असतो हा स्ट्राइक रेट भाजप आणि मोदी शाहांमुळे झाला. मोदी शाहांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावरती दबाव आणला नसता तर एकनाथ शिंदे यांना धनुष्यबाण आणि चिन्ह कायद्याने मिळालं नसतं, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे

मविआचं जागावाटप कधी?

पैसा आणि यंत्रणा हा सर्व महायुतीचा स्ट्राईक रेट आहे. शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये स्ट्राईक रेटची एवढी खूमखुमी असेल तर त्यांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि निवडणूक लढवावी. मग स्ट्राइक रेट जरूर दाखवावा. आमच्यामध्ये स्ट्राईक रेट हा विषय कुठेच येत नाही. जागावाटप संदर्भात उद्यापासून आमची चर्चा सुरू होईल. 18 ,19, आणि 20 या तारखेला आम्ही तिन्ही पक्षातील लोक एकत्र बसणार आहोत आणि त्यातून जो फॉर्मुला येईल कोणी कुठून लढायचे तो अंतिम राहील. जिंकेल त्याची जागा हीच पक्षाची मागणी आहे, असं संजय राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊतांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात. वाढदिवसाच्या शुभेच्छा… नरेंद्र मोदींच्या काळात देश पुढे वाढत असेल तर किती फुट किती मीटर वाढला ते आम्हाला बघावे लागेल. आम्हाला एवढेच माहित आहे की चायना पुढे वाढत आहे ते देखील मोदी यांच्या कार्यकाळात वाढत आहे. मणिपूर हातातून जात आहे. खासदार आणि आमदार विकत घेत आहेत, असं राऊतांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;