गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिस सज्ज, ड्रोन कॅमेऱ्यांनी विसर्जन मिरवणूकांवर लक्ष

गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलिस सज्ज, ड्रोन कॅमेऱ्यांनी विसर्जन मिरवणूकांवर लक्ष

गणपती बाप्पा दहा दिवस भक्तांचा पाहुणचार घेऊन आपल्या गावाला निघाले आहेत. त्यामुळे भक्तांच्या डोळ्यात अश्रू उभे राहीले आहेत. मुंबईतून अनंत चतुर्दशीला होणार्‍या विसर्जनासाठी सर्व चौपाट्या आणि मिरवणूक मार्गावर प्रचंड सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांचा 23 हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर त्यासाठी उतरणार आहे. मुंबई महानगर पालिकेने देखील विसर्जनासाठी 12 हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहेत. 71 नियंत्रण कक्षांमधून या गणेश विसर्जन मिरवणूकीवल लक्ष ठेवले जाणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनसाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे.

लाडक्या बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर आता दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन करण्यात येणार आहे. गणपती विसर्जनासाठी मुंबई पोलिस दल सज्ज झाले आहे. मुंबई पोलिस दलाच्या 23,400 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच 2,900 पोलीस अधिकारी आणि 20,500 पोलीस कर्मचारी विसर्जनाच्या दिवशी बंदोबस्तासाठी सज्ज करण्यात आले आहे. यात 40 पोलीस उप-आयुक्त (डीसीपी) आणि 50 सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) बंदोबस्तावर देखरेख ठेवणार आहेत.

लालबागच्या राजासाठी विशेष सुरक्षा कवच

मुंबईतील सीसीटीव्ही कॅमेरांच जाळं आणि ड्रोन कॅमेरे सुसज्ज ठेवले जाणार असून विसर्जन मिरवणुकीवर आकाशातून नजर ठेवली जाणार आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाणार आहे. तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी पोलिसांचं विशेष सुरक्षा कवच असणार आहे. राज्य राखीव पोलीस बल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक यांची देखील तैनाती करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांनी रस्त्याच्या वाहतूकीत देखील बदल केले आहेत. बेस्टच्या बसेसचे मार्ग बदलण्यात आले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर भक्ताच्या सोयीसाठी विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;