Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : आशिष देशमुख यांचा महायुतीच्या मंत्र्यांवर आरोप, पाहा Video

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : आशिष देशमुख यांचा महायुतीच्या मंत्र्यांवर आरोप, पाहा Video

महायुतीत मागील अनेक दिवसांपासून वादंग सुरुय.. दरम्यान भाजप नेते आशिष देशमुखांनी महायुतीच्या मंत्र्यांवर केलेल्या आरोपांनंतर महायुतीमधला वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील हे सुनील केदार आणि अनिल देशमुखांच्या दबावात काम करत असल्याचा आरोप आशिष देशमुखांनी केलाय.

दरम्यान आशिष देशमुखांनी धनंजय मुंडे आणि सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटलांवर कोणते आरोप केलेयत. ‘नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सहकार कायद्यानुसार सुनील केदार आरोपी आहेत’. दरम्यान या प्रकरणी इतर दोषी संचालकांकडून प्रस्तावित वसुलीच्या प्रकरणात वळसे पाटील वारंवार सुनावणी टाळून सुनील केदार यांना साथ देत आहेत. तसंच 12 सप्टेंबर रोजी विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसाठी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली होती. मात्र अनिल देशमुख यांच्या दबावाखाली धनंजय मुंडे यांनी ती बैठक अचानक रद्द केली असा आरोप आशिष देशमुखांनी मुडे आणि वळसे पाटलांवर केले आहेत.

पाहा व्हिडीओ:-

आशिष देशमुखांनी महायुतीच्या मंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर विजय वडेट्टीवारांनी महायुतीला टोला लगावलाय. तसंच आशिष देशमुखांचा बोलवता धनी वेगळा असेल असाही दावा यावेळी वडेट्टीवारांनी केलाय. दरम्यान महायुतीमध्ये शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील आणि तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतरही वाद निर्माण झाला होता. या दोन्ही मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. महायुतीमधील अंतर्गत वाद मागील काही दिवसांपासून समोर येताय. दरम्यान भाजप नेते आशिष देशमुखांनी धनंजय मुंडे आणि वळसे पाटलांवर केलेल्या आरोपानंतर महायुतीमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून आलाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;