कृपाशंकर सिंह यांना भाजपामध्ये मोठी जबाबदारी मिळणार का?

कृपाशंकर सिंह यांना भाजपामध्ये मोठी जबाबदारी मिळणार का?

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृपाशंकर सिंह यांना भाजपामध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते. काँग्रेसमधून राजकारणाची सुरुवात करणाऱ्या कृपाशंकर सिंह यांनी तीन वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला. कृपाशंकर सिंह हे भाजपाचा मुंबईतील उत्तर भारतीय चेहरा आहेत. उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी कृपाशंकर सिंह यांच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. गणपती दर्शनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. गुरुवारी रात्री 9.30 वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृपाशंकर सिंह यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी गणपती दर्शनासाठी गेले होते.

गणपती दर्शनानंतर दोन्ही नेत्यांमध्ये विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली असल्याचे वृत्त आहे. यावेळी विधानसभा निवडणुकीत कृपाशंकर सिंह यांना मोठी जबाबदारी मिळू शकते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने कृपाशंकर सिंह यांना उत्तर प्रदेश जौनपुरमधून उमेदवारी दिली होती. जौनपूर हा कृपाशंकर सिंह यांचा गृहजिल्हा आहे. मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. समाजवादी पार्टीच्या बाबू कुशवाहा यांनी कृपाशंकर सिंह यांचा पराभव केला. कृपाशंकर सिंह यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचा आरोप झाला होता.

काँग्रेसमध्ये असताना का राजीनामा दिला?

2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून आर्टिकल 370 व 35A हटवल्यानंतर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर कृपाशंकर सिंह यांनी प्रश्न उपस्थित केले होते. काँग्रेसच्या या भूमिकेच्या निषेधार्थ त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. काँग्रेसच्या सत्ताकाळात 2004 साली विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये कृपाशंकर सिंह हे राज्यमंत्री होते. मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद, आमदार, राज्यमंत्री, काँग्रेसमध्ये असताना महत्त्वाची पद कृपाशंकर सिंह यांनी भूषवली आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;