मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठे भगदाड, गाडी अडकली

मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला मोठे भगदाड, गाडी अडकली

Mumbai Prabhadevi Big Pothole :  मुंबईतील प्रभादेवी परिसरातील एका रस्त्याला मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात एक गाडी अडकल्याचेही पाहायला मिळत आहे. प्रभादेवी परिसरातील हार रस्ता मध्येच खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे रस्ते बांधकामावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

रस्त्याला मोठे भगदाड

गेल्या काही दिवसांपासून रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा दावा सर्वसामान्य नागरिकांकडून केला जात आहे. त्यातच आता मुंबईत एक मोठी दुर्घटना टळली आहे. मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेल्या एका रस्त्याला मोठे भगदाड पडले आहे. यामुळे परिसरात सध्या गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मोठी वाहतूक कोंडी

प्रभादेवी परिसरात खचलेल्या या रस्त्यात एक गाडी अडकल्याचे पाहायला मिळत आहे. या कारचा पुढचा टायर या खड्ड्यात अडकला. त्यामुळे या परिसरात मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. तसेच रस्त्यावर खड्डा पडलाय हे समजताच आजूबाजूला असलेल्या अनेकांनी तो पाहण्यासाठी गर्दी केली.

मुंबईतील प्रभादेवी परिसरात असलेला हा रस्ता सिद्धीविनायक मंदिराकडे जातो. सध्या गणेशोत्सवाचे दिवस सुरु आहेत. या काळात मोठ्या प्रमाणात भाविक सिद्धीविनायक दर्शनासाठी येत असतात. त्यासोबतच या परिसरात अनेक कॉर्पोरेट ऑफिस देखील आहेत. त्यातच आता या रस्त्याला खड्डा पडल्याने मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे.

पाहा व्हिडीओ

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;