मरीन ड्राईव्ह ते वांद्रे थेट 12 मिनिटांत… आता वेगवान होणार प्रवास

मरीन ड्राईव्ह ते वांद्रे थेट 12 मिनिटांत… आता वेगवान होणार प्रवास

गेल्या काही महिन्यांत मुंबईमधील अनेक विकासकामांना जोर आला आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईत सुरू असलेले अनेक प्रकल्प पूर्णत्वास येत असून त्यामुळे प्रवासही वेगवान झालायं. पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुसाट होण्याच्या दृष्टीने महत्वाचा ठरणारा कोस्टल रोड वांद्रे-वरळी सी लिंकला जोडण्याचं कामंही पूर्ण झालं असून आज या मार्गाचं उद्घाटन होणरा आहे. त्यामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 12 मिनिटांत पोचता येणार आहे. दक्षिण मुंबईपासून वांद्रे वरळी सी-लिंकपर्यंत सिग्नलमुक्त , वेगवान प्रवास आता या रस्त्यामुळे शक्य होणार आहे. कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट झाल्यानं वरळीच्या बिंदु माधव चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल.

मुंबई कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सीलिंकला जोडणाऱ्या कनेक्टरचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल.  या नवीन मार्गामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे हा प्रवास अवघ्या 12 मिनिटांत करता येईल असा दावा करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे आता मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.

या प्रकल्पात प्रिन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते वरळी सी-लिंक असा 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात आला आहे. मरीन ड्राइव्ह ते हाजीअलीपर्यंत 6.25 किमीचा मार्गही सुरू झाला आहे. तर आता याच सागरी मार्गाला पुढे असणारा 4.5 किमी लांबीचा वांद्रे-वरळी सी-लिंक जोडण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार असून वेळेची मोठी बचत होणार आहे.

या प्रकल्पातील मुख्य टप्पा असलेला 136मीटरचा  पट्टा सर्वांत मोठ्या बो स्टिंग आर्च गर्डरने जोडण्यात आला आहे. दोन हजार मेट्रिक टन वजनाचा महाकाय गर्डर जोडण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे आता कोस्टल रोड सी-लिंकला वरळी येथे जोडला गेल्याने वांद्रयाहून दक्षिण मुंबईत प्रवास वेगाने करता येणार आहे.  कोस्टल रोड आणि सी लिंक कनेक्ट झाल्यानं वरळीच्या बिंदू माधव चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल अशी अपेक्षा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;