टिटवाळा स्थानकादरम्यान एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली

टिटवाळा स्थानकादरम्यान एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा कोलमडली

‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी काहीशी स्थिती मध्य रेल्वेची झाली आहे. कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, कर्जत, ठाणे या ठिकाणी राहणाऱ्या प्रवाशांना दररोज मध्य रेल्वेचा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मध्य रेल्वेचे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आता एका एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मध्य रेल्वेचा मोठा खोळंबा झाला आहे. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावर कल्याणहून कसाराकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. टिटवाळा स्थानकादरम्यान गीतांजली एक्सप्रेसमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे कल्याणहून कसाराकडे जाणार वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

या बिघाडामुळे अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सध्या कल्याण स्थानकात अनेक गाड्या एका पाठोपाठ एक उभ्या राहिल्याचे दिसत आहेत. यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील लोकल वाहतूक उशिराने सुरु आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसत आहे.

 मध्य रेल्वे कायमच उशिरा

दरम्यान मध्य रेल्वे ही उशिराने धावत असल्याची तक्रार सातत्याने प्रवाशांकडून केली जात आहे. मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक कायमच कोलमडले असल्याचे पाहायला मिळते. कर्जत, कसाराहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या धिम्या व जलद मार्गावरील लोकल सेवा पूर्ण विस्कळीत झाली.लोकल सेवा विस्कळीत झाल्याने दिवा, कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, टिटवाळा रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली. अनेक लोकल या अनियमित वेळेत धावत होत्या.

सकाळी लाखो चाकरमानी हे मुंबई लोकलने प्रवास करत ऑफिस गाठतात. मात्र अचानक हा बिघाड झाल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांना ऑफिसला पोहोचायला, तसेच विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाण्यास उशीर झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे अनेक कर्मचारी संतप्त झाले आहेत. तसेच रेल्वे उशिराने धावत असल्याने स्टेशनवरही मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;