मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावरील देखाव्यातून अजित पवार गायब

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावरील देखाव्यातून अजित पवार गायब

महायुतीत सारं काही आलबेल आहे ना? असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या घटना सातत्याने घडत आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये वाद झाल्याची चर्चा सुरु होती. असं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शाह यांच्यासोबत बघायला मिळाले. विशेष म्हणजे महायुतीच्या नेत्यांची शाह यांच्या उपस्थितीत बैठकही झाली. पण अजित पवार त्या बैठकीत उपस्थित नव्हते. अजित पवार यांनी ऐनवेळी शाह दिल्लीत परतत असताना मुंबई विमानतळावर भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. असं असताना आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावरील देखाव्यातून अजित पवार यांचा फोटो गायब आहे.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने वर्षा बंगल्यावर योजनांचा देखावा करण्यात आला आहे. या देखाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे. पण या देखाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो गायब आहे. या देखाव्यात अनेक योजनांचा फोटो आहे. पण अजित पवार यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

देखाव्यात नेमकं काय आहे?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखावा तयार करण्यात आला आहे. या देखाव्यात राज्य सरकारच्या विविध योजनांचे फोटो लावण्यात आले आहेत. या देखाव्याच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती दिली जात आहे. पण या देखाव्यात अजित पवारांचा फोटो गायब आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या ऐवजी खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो बघायला मिळतोय.

ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या माहिती देखाव्यात केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे. महाराष्ट्रातील देखाव्यात देखील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि श्रीकांत शिंदे यांचा फोटो आहे. अजित पवार यांचा फोटो केवळ वैद्यकीय सहाय्यता कक्ष पोस्टरवर आहे. ड्रीम प्रोजेक्ट, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि महाराष्ट्राच्या नकाशातून देखील अजित पवार गायब आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांच्याकडून काय प्रतिक्रिया देण्यात येते? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;