थेट मुख्यमंत्रीच लाडक्या बहिणींच्या दारी जाणार, स्ट्रॅटेजी काय ठरली?, अजितदादानंतर शिंदे गट सक्रिय?

थेट मुख्यमंत्रीच लाडक्या बहिणींच्या दारी जाणार, स्ट्रॅटेजी काय ठरली?, अजितदादानंतर शिंदे गट सक्रिय?

महाराष्ट्रात आगामी काळात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत मिळत आहेत. कारण आगामी काळात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष आपापली रणनीती ठरवत आहे. विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर असताना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली. या योजनेचा पहिला हफ्ता महिलांच्या बँक खात्यामध्येही जमा झाला आहे. तसेच अनेक महिला अजूनही या योजनेपासून वंचित आहेत. त्यांच्याकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या योजनेचा फायदा मिळावा यासाठी महिलांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तर दुसरीकडे या योजनेच्या माध्यमातून राजकीय फायदा मिळवण्यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ आता शिंदे गट देखील लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सक्रिय झाला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाकडून लाडकी बहीण योजनेची जोरदार जाहीरात करण्यात आल्यानंतर महायुतीत धुसफूस सुरु झाल्याची चर्चा होऊ लागली. अजित पवार एकटेच या योजनेचं श्रेय घेत असल्याचा दावा महायुतीच्या इतर नेत्यांकडून करण्यात आला. यावरुन मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी झाल्याची चर्चा आहे. अर्थात या वादावर आता पडदा पडला आहे. पण यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्षही निवडणुकीच्या घोषणेआधीच लाडकी बहीण योजनेच्या प्रचारात उतरला आहे. मुख्यमंत्र्यांनी यासाठी नव्या योजनेची देखील घोषणा केली.

मुख्यमंत्री उद्यापासून नव्या योजनेला सुरुवात करणार

शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ बंगल्यावर आज शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसह राज्यभरातील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत झूम मिटींगद्वारे बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना कुटुंबभेट ही योजना जाहीर केली आहे. या योजनेच्या अंतर्गत शिवसेनेच्या राज्यभरतील पदाधिकारी हे रोज 15 कुटुंबांना भेटून मुख्यमंत्री लडकी बहीण योजनेचा आढावा घेणार आणि ज्या कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे त्या कुटुंबाला ती योजना कशी मिळणार यासंदर्भात मदत करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वःतच उद्या 15 कुटुंबांना भेट देऊन माहिती घेणार आहेत.

मुख्यमंत्री बैठकीत नेमकं काय म्हणाले?

“आपण उद्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कुटुंबभेट ही योजना सुरु करत आहोत. या योजनेच्या माध्यमातून आपण घरोघरी जावून या योजनेचा महिलांना लाभ मिळतोय का? याची चौकशी करायची आहे. तसेच ज्या महिलांना लाभ मिळत नाहीय त्यांना लाभ कसा मिळेल? यासाठी प्रयत्न करणार आहोत. या योजनेचा शुभारंभ उद्यापासून होईल. मी स्वत: उद्या 15 कुटुंबांना भेट देणार आहे”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठकीत म्हणाले.

“एखाद्या परिवारात लाभार्थी महिलेला योजनेचा लाभ मिळाला नसेल तर तो लाभ कसा मिळेल यासाठी मार्गदर्शन करणार आहोत. तसेच शासनाच्या ज्या 10 पेक्षा जास्त योजना आहेत त्याचा लाभ महिलांना मिळत आहे ना, याची चौकशी आम्ही करु. या योजनांबाबत आम्ही माहिती देऊ. तसेच ज्या घरांमध्ये सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांना मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेचा लाभ कसा मिळेल यासाठी मार्गदर्शन करु”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;