पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद ड्रायव्हरने चिरडलं, मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू

पुण्यात पुन्हा ड्रिंक अँड ड्राईव्ह, मद्यधुंद ड्रायव्हरने चिरडलं, मनसे पदाधिकाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू

पुण्यातील कल्याणीनगर येथे काही महिन्यांपूर्वी पोर्श कारचा झालेला अपघात, ते प्रकरण खूप गाजलं. बिल्डरच्या लाडावलेल्या, अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने कार चालवली आणि बाईकस्वारांना चिरडलं. त्यात दोघांचा मृत्यू झाला. हे प्रकरण अजूनही चर्चेत असतानाच पुण्यातील पौड फाट्याजवळ काल रात्री असाच एक भीषण अपघात झाला. त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.  पौडफाट्याजवळ रात्री 11 च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या ड्रायव्हरने पीक अप गाडीने 4-5 वाहनांना जबरदस्त धडक दिली. या अपघातामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे हे गंभीर जखमी झाले तर त्यांची तर पत्नी गीतांजली अमराळे यांचा मृत्यू झाला. श्रीकांत अमराळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातास कारणीभूत ठरलेल्या आशिष पवार र या ड्रायव्हरला अलंकार पोलिसांनी ताब्यात घेतलं असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

अपघाताचा थरार

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील कोथरून येथील करिश्मा चौकात या ड्रायव्हरने अनेक गाड्यांना धडक दिली. तेथेही काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र एवढं होऊनही तो काही थांबला नाही, तो दारूच्या नशेत ट्रक चालवत पुढे गेला आणि अनेक गाड्यांना धडक देत होता. त्यानंतरही त्याने गाडी थांबवलीच नाही तर पुढेच नेली. त्यावेळी तेथे सिग्नलजवळ मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे व त्यांची पत्नी गीतांजली हे उभे होते. आरोपी ड्रायव्हरने दारूच्या नशेत पिकअप ट्रक थेट त्यांच्या अंगावरच चढवला. गीतांजली अमराळे यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताचा हा थरार तेथील गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला आणि त्यांनी धाव घेत टेम्पो थांबवून आरोपी ड्रायव्हर आशिष याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. अलंकार पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;