‘मेंदू नसलेल्या लोकांनी…’, नवनीत राणा यांची संजय राऊत यांच्यावर खोचक टीका

‘मेंदू नसलेल्या लोकांनी…’, नवनीत राणा यांची संजय राऊत यांच्यावर खोचक टीका

माजी खासदार तथा भाजप नेत्या नवनीत राणा यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली आहे. नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी एकत्रपणे मुंबईत लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी नवनीत राणा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. शाह दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात. त्यांच्या या दौऱ्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. “सर्वच गोष्टी गुजरातला घेऊन चालले आहेत. आता लालबागचा राजाही गुजरातला घेऊन जातील”, अशी टीका संजय राऊतांनी केली होती. तसेच संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. त्यांच्या या टीकेबाबत नवनीत राणा यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी संजय राऊतांवर अतिशय खोचक शब्दांत निशाणा साधला.

“मला एक गोष्ट एवढीच कळते की, ज्यांच्या डोक्यात मेंदू नाही, त्यांनी जे खूप हुशार आहेत, आख्ख्या देशाने ते पाहिलेलं आहे, अशा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलू नये”, अशी टीका नवनीत राणा यांनी केली. तसेच “विचित्र बोलणारे जे लोकं आहेत, त्यांच्याबद्दल आपण काही बोलू नये. ते दिवसा जे स्वप्न पाहत आहेत ते खरं होणार नाही. आमचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचच सरकार येणार”, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

बाप्पाकडे काय प्रार्थना केली? नवनीत राणा म्हणाल्या….

“बाप्पाला फक्त एवढीच मागणी केली आहे की, ज्या इमानदारीने आम्ही लोकांसाठी काम करतोय, आम्हाला अजून ताकद द्या. आम्ही अजून त्याच ताकदीने आमच्या लोकांची कामे केली पाहिजेत. आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जोडी सदाबहार राहावी. आगामी काळात त्यांच्या कामाच्या आधारावरच पुन्हा महायुतीची सत्ता यावी एवढीच देवा चरणी प्रार्थना केली आहे”, अशी प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी यावेळी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;