शरद पवारांच्या मनात काय हे त्यांच्या बायकोलाही माहीत नसते, तर… जितेंद्र आव्हाड यांचा कुणावर निशाणा?

शरद पवारांच्या मनात काय हे त्यांच्या बायकोलाही माहीत नसते, तर… जितेंद्र आव्हाड यांचा कुणावर निशाणा?

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात महायुती आणि महाविकासा आघाडीतील नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. दोन्ही गोटातून गोटमार करण्यात येत आहे. शा‍ब्दिक टीकांनी एकमेकांना घायाळ करण्यात येत आहे. शुक्रवारी टीव्ही 9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. महाविकास आघाडीत कोण मुख्यमंत्री होणार यावरुन त्यांनी टीका केली होती. त्याला आज जितेंद्र आव्हाड यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

काय म्हणाले होते फडणवीस?

शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांची टीव्ही9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी मुलाखत घेतली होती. त्यात फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना शरद पवार यांच्या मनात काय सुरू आहे, याचा अंदाज व्यक्त केला होता. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करावा आणि तो आपला असावा यासाठी उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत तळ ठोकून होते. त्यांनी सोनिया गांधी यांच्याबरोबर चर्चा केली. पण बैठकीचे छायाचित्र काढण्यास परवानगी दिली नाही. दिल्लीत उद्धव ठाकरे यांच्या हातात काहीच लागले नाही. आता तर शरद पवार यांनी पण स्पष्ट केले आहे की, मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार नाही. काँग्रेसचे नाना पटोले यांनी पण तीच री ओढली. उद्धव ठाकरे यांच्या मनात जे आहे, ते घडून येताना दिसत नाही. शरद पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचे? हे शिजत आहे. त्यांच्या डोक्यात जे तीन-चार चेहरे आहेत, त्यात उद्धव ठाकरे यांचा चेहरा नक्कीच नाही, असे फडणवीस म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांचा खोचक टोला

जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला. शरद पवारांच्या मनात काय हे त्यांच्या बायकोला उभ्या महाराष्ट्राला माहिती नसते तर देवेंद्रंना काय माहिती असणार असा पलटवार आव्हाड यांनी केला आहे.

खोलवर झालेल्या जखमेचा वर्ण जात नाही

आज गणेशोत्सव निमित्त आलो होतो माहिती घेतली ते येणार होते, मी आलो. भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा कशी होणार त्यांच्या घरी गर्दी खूप होती, असे ते म्हणाले. सुप्रिया ताईंचे तसे वक्तव्य नव्हते, त्या असं कधीच बोलत नाहीत, पत्रकारांनी चुकीची माहिती दिली
आमचे वैचारीक मतभेद आहेत पण मैत्री आहेत. आमची मैत्री आहे पण मुख्यमंत्री झाल्या पासून त्यांचे मित्र वाढलेत असे आव्हाड म्हणाले. खोलवर झालेल्या जखमेचा वर्ण जात नाही, असा चिमटा त्यांनी अजितदादा यांना काढला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;