गणपती बाप्पाचं विसर्जन करताना कोणती काळजी घ्या, मुंबई महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या 5 सूचना काय?

गणपती बाप्पाचं विसर्जन करताना कोणती काळजी घ्या, मुंबई महापालिकेच्या अत्यंत महत्त्वाच्या 5 सूचना काय?

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गणेश विसर्जनादरम्यान मुंबईतील समुद्रात मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांना मत्स्यदंश करू शकणारे अपायकारक मासे हे मत्स्य विभागाने केलेल्या ‘ट्रायल नेटिंग’ मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (महाराष्ट्र शासन) यांच्याकडून कळविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाने गिरगाव आणि दादर चौपाटी येथे गणेश भक्तांना मत्स्यदंश करणाऱ्या माशांचे अस्तित्व आहे काय ? यासाठीची चाचपणी (ट्रायल नेटिंग) नुकतीच केली. यादरम्यान ढोमी, कोळंबी, स्टिंग रे (पाकट), जेली फीश, शिंगटी, ब्लू जेली फीश, घोडा मासा, छोटे रावस आदी मासे आढळून आहेत. नेटींग दरम्यान पाकट (स्टिंग रे) हे मासे आढळून आले आहेत.

माशांसोबतच जेली फीश, ब्लू जेली फीश हे अपायकारक मासे आढळून आले आहेत. वरील अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करताना खालीलप्रमाणे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

विसर्जनादरम्यान घ्यावयाची काळजी

1. श्रीगणेश मूर्ती विसर्जन हे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेमणूक केलेल्या जीवरक्षक व संबंधित यंत्रणेमार्फत करावे.

2. श्रीगणेश मूर्ती विसर्जनादरम्यान गणेशभक्तांनी उघड्या अंगाने समुद्रात प्रवेश करणे टाळावे.

3. गणेश विसर्जनादरम्यान पायाला मत्स्यदंश होऊ नये म्हणून गमबुटांचा वापर करावा.

4. बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस दल यांच्याद्वारे विसर्जन ठिकाणी वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

5. श्रीगणेश मूर्ती विसर्जन ठिकाणी आवश्यक तेथे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे प्रथमोपचार करण्यासाठी वैद्यकीय कक्ष असणार आहेत. मत्स्यदंशाची घटना घडल्यास संबंधितांनी तात्काळ प्रथमोपचारासाठी या वैद्यकीय कक्षाशी संपर्क साधावा.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;