वरळीमधून तुमच्याविरूद्ध अमित ठाकरे लढले तर..? आदित्य ठाकरे यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…

वरळीमधून तुमच्याविरूद्ध अमित ठाकरे लढले तर..? आदित्य ठाकरे यांचं एका वाक्यात उत्तर, म्हणाले…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यंदा वरळीमधूनही ते आपला उमेदवार देणार आहेत, असं आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलं. यावर बोलताना, अनेक उमेदवार उतरतात. 15 ते 20 उमेदवार निवडणूक लढवतात. अनेक लोक येत असतात. पंतप्रधान मोदींना तीनदा कमी मते मिळाली. आमच्या उमेदवारांना असं काही घडत नाही. पाच वर्ष सातत्याने काम करणारे पक्ष असतात. काही पक्ष निवडणुकीला उठतात. मी मनसेवर टीका करणार नाही. मी वरळीतूनच लढणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.  त्यानंतर जर राज ठाकरेंनी अमित ठाकरेंना वरळीमधून उमेदवारी देण्याबाबत विचारण्यात आलं.

जरतर वर बोलण्यात अर्थ नाही. वरळी माझा मतदारसंघ आहे. सरकारमध्ये असताना मी कधीच कोणत्याही मतदारसंघावर अन्याय केला नाही. गुंतवणूकदारांना सांगायचो महाराष्ट्र आमचा आहे. प्रत्येक जिल्हा आमचा आहे, सर्वांना रोजगार द्या, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरेंनी सांगितला मविआमधील मुख्यमंत्रिपदाचा चेहरा

त्यांच्यातून चेहरा कोण,. ते जिंकत नाहीत. हाच चेहरा घेऊन ते जाणार आहेत का. त्यांचं सरकार आहे. त्यांनी सांगावं. आम्ही आमची भूमिका मांडली. उद्धव ठाकरे हा आमचा चेहरा आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. लोक त्यांना पालक म्हणून पाहत आहे. पण महायुतीकडे चेहरा कोण आहे. जे योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात ते आम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे विचारत आहे असल्याचं म्हणतात महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांवर निशाणा साधला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;