महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? आदित्य ठाकरे यांनी थेट नावच सांगितलं

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? आदित्य ठाकरे यांनी थेट नावच सांगितलं

आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याचं बघायला मिळत आहे. याबाबत ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “महायुतीकडे चेहरा कोण? ते जिंकत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन ते जाणार आहेत का? त्यांचं सरकार आहे. त्यांनी सांगावं. आम्ही आमची भूमिका मांडली. उद्धव ठाकरे हा आमचा चेहरा आहे. त्यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. लोक त्यांना पालक म्हणून पाहत आहे. पण महायुतीकडे चेहरा कोण आहे? जे योजनेच्या क्रेडिटवरून भांडतात ते आम्हाला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे विचारत आहेत”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“आमचा आग्रह एकच आहे, तो म्हणजे बदल झाला पाहिजे. महाराष्ट्र म्हणून आवाहन आहे. महाराष्ट्र द्वेष्टे सरकार आहे. मिंधे कधीही निघून जातील. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल. ज्यांनी निर्लज्जपणे गद्दारी केली ते जातील. अजूनही अंतर्गत चर्चा होईल. सीटवरून ताणलं गेलं असं ऐकायला येईल. हे व्हायला पाहिजे. तिन्ही पक्षाची ताकद असेल तर तुम्ही ती सीट मागाल. त्यात खिंचतान होईल”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘भाजपच्या वरिष्ठांच्या मनातही मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांचं नाव नाही’

“माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या डोक्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंही नाव नाही. फडणवीस यांच्या वरिष्ठांच्या मनातही मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचं नाव नाही. सर्वात जास्त जागा, बहुमताचं सरकार महाविकास आघाडीचं येईल. आम्ही सर्वजण महाराष्ट्र हितासाठी लढत आहोत. महाराष्ट्राच्या हक्कासाठी लढत आहोत. आमचं सरकार असतं तर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असती. पोलीस हाऊसिंगचं काम सुरू झालं असतं”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘मी मनसेवर टीका करणार नाही’

“अनेक उमेदवार उतरतात. १५ ते २० उमेदवार निवडणूक लढवतात. अनेक लोक येत असतात. पंतप्रधान मोदींना तीनदा कमी मते मिळाली. आमच्या उमेदवारांना असं काही घडत नाही. पाच वर्ष सातत्याने काम करणारे पक्ष असतात. काही पक्ष निवडणुकीला उठतात. मी मनसेवर टीका करणार नाही. मी वरळीतूनच लढणार आहे”, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;