आम्ही सांगून अजित पवारांनी स्वभाव बदलला नाही, परंतु आता त्या कंपनीने सांगितल्यावर….जयंत पाटील यांनी टोचले कान

आम्ही सांगून अजित पवारांनी स्वभाव बदलला नाही, परंतु आता त्या कंपनीने सांगितल्यावर….जयंत पाटील यांनी टोचले कान

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकत्र असलेले जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्या स्वभावावर बोट ठेवले. ‘टीव्ही ९ मराठी’च्या महाराष्ट्राच्या महासंकल्प या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी रोखठोक अजित पवार यांच्यासंदर्भातीत माहिती दिली. ते म्हणाले, मी आणि अजित पवार अनेक वर्ष एकत्र होतो. आम्ही त्यांना अनेक सूचना करायचो. आम्ही सांगूनही कधी अजित पवार बदलले नाही. त्यांनी आपला स्वभाव बदलला नाही. परंतु एका कंपनीला आता त्यांनी प्रचंड पैसे दिले आहेत. त्यांच्या जनसंपर्काचे काम ती कंपनी करत आहे. त्या कंपनीने सांगितल्याप्रमाणे अजित पवार बदलले आहेत. ते सांगतात तसे कपडे घालत आहेत,  तसे कार्यक्रम करते, असा टोला जयंत पाटील यांनी अजित पवार यांना लगावला.

सरकारने आत्मविश्वास गमावला आहे. ३०० कोटी रूपये जाहिरातीसाठी, ३०० कोटी रुपये योजना दूतांना दिले आहेत. सहा महिन्यांचं कंत्राट दिले आहे. त्यांना प्रत्येकी दहा हजार पगार दिला जात आहे. आता सरकारच्या जाहिराती सुरू होतील. सासू सुनेच्या मालिकेमध्येच एकनाथ शिंदेची जाहिरात येईल. मग लोक वैतागणार आहेत. त्यामुळे सरकारला सूचना आहे की, जाहिरात मालिकेच्या सुरुवातीला किंवा शेवटी दाखवा. नाही तर लोकप्रियता कमी होईल.

लाडक्या बहिणींची ओढताण

लाडक्या बहिणींची ओढताण सुरू आहे. तीन भाऊ ओढतान करत आहे. पण तिचं प्रेम विरोधकांवर आहे. कधी हे लोक जातात आणि आपले लाडके भाऊ सत्तेत येतात हे ते पाहत आहे. महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही. पण या त्रिकुटाने महाराष्ट्र झुकवला. गुजरातपुढे झुकले आहे.

या योजनेमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम

लाडकी बहीणसारखी योजना अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करू शकते. ती व्यापक करायला हवी होती. एका घरात तीन चार अर्ज असतील तरी त्यांना पैसे दिले. निवडणुकीनंतर ते रिव्हाईज करतील. त्यानंतर कमी लोकाना पैसे मिळेल, असे एका आमदाराने सांगितले. पण आमचं सरकार आलं तर आम्ही ही योजना चांगली करू. राज्यातील बहिणीच्या केसाला धक्का लावणार नाही, अशी योजना करू.

मराठा आरक्षणावर जयंत पाटील

यापूर्वी सर्व पक्षीय बैठका सह्याद्रीवर झाल्या आहेत. त्यानंतर जरांगे यांचं आंदोलन झालं. जरांगे नवी मुंबईत आले. मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं. घोषणा केली. मोठा आनंदी सोहळा झाला. आम्हाला असे वाटतं की मुख्यमंत्र्यांनी जरांगेच्या सर्व मागण्या मान्य केल्या असतील. सरकारने जरांगेंना दिलेली आश्वासने काय आहेत हे आम्हाला अधिवेशनात सांगितलं नाही. आम्हाला बोलावून त्यांनी विरोधकांना कधी कल्पना दिली नाही. सरकारने त्यांना जे आश्वासन दिले असतील तर ते पूर्ण करण्यासाठी सराकरने निर्णय घ्यावा. काय आश्वासन दिले ते आम्हाला माहीत नाही. सरकार त्यांचा आहे. त्यांनी निर्णय घ्या. तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आम्ही विरोध करणार नाही. तुम्ही प्रचंड वेळकाढूपणा केला आहे. निर्णय घेतला नाही. खेळवत राहिला आहात. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. तुम्ही विरोधकांकडे का बोट दाखवता. तुम्ही निर्णय घ्या. आमची काय भूमिका आहे. या पेक्षा सरकारला काय करायचं आहे. सरकारने निर्णय घ्यावा. आम्ही सरकारमध्ये नाही. आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. तुम्ही निर्णय घ्या, असे जयंत पाटील म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;