मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्या डोक्यात कोण? उद्धव ठाकरे की… देवेंद्र फडणवीस यांनी…

मुख्यमंत्रीपदासाठी शरद पवार यांच्या डोक्यात कोण? उद्धव ठाकरे की… देवेंद्र फडणवीस यांनी…

‘टीव्ही ९ मराठी कॉन्क्लेव्ह’मध्ये महाराष्ट्राचा महासंकल्पात भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत शुक्रवारी झाली. ‘टीव्ही ९ मराठी’चे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेतली. त्यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर उत्तर दिले. यावेळी शरद पवार यांच्या डोक्यात महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे नाही, हे फडणवीस यांनी सांगितले. परंतु इतर तीन, चार जण आहेत. ते कोण आहेत, हे आपण सांगणार नाही. परंतु उद्धव ठाकरे नाहीत, हे नक्की आहे, असेही त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत

उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत होते. त्यांची अपेक्षा होती त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित व्हावा. पण तसे झाले नाही. आम्ही दिल्लीत जातो की, आमचा राष्ट्रीय पक्ष आहे. परंतु उद्धव ठाकरे तीन दिवस दिल्लीत बसले. परंतु सोनिया गांधींनी त्या बैठकीचा फोटोही जाहीर होऊ दिला नाही. कारण तीन दिवसांत काही झाले नाही. त्यानंतर शरद पवार यांनीही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार नाही हे जाहीर केले. नाना पटोले यांनी त्यांची री ओढली. त्यामुळे हे पक्क झाले की उद्धव ठाकरेंच्या मनात जे होते. त्यांना चेहरा समोर ठेवायचं ते झालं नाही. पवारांच्या डोक्यात कुणाला मुख्यमंत्री करायचं हे जवळजवळ शिजतंय. ते नाव काय हे मला विचारू नका. परंतु त्यांच्या डोक्यात तीन चार चेहरे असतील. त्यात उद्धव ठाकरे नाही. त्यांच्या डोक्यात कोण आहे हे सांगणं कठीण आहे.

तो सर्व्हे लीक केला…

तो सर्व्हे लिक झाला. काँग्रेसचा लिक झाला. सर्व्हे असा लिक होतो का? तसा लिक केला. हा टेबलावरचा सर्व्हे आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी तयार केलेला हा सर्व्हे आहे. तुम्ही कुठे मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पाहता तुम्ही चौथ्या पाचव्या नंबरवर आहात. ही त्यांची जागा सर्व्हेतून दाखवून दिली आहे. मविआ आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री करणार नाही, असं माझं मत आहे.

आमच्याकडे वाद नाही…

ठाकरेंची शिवसेना आणि आम्ही नॅचरल अलायन्स होतं. हिंदुत्वाची मते एकत्रित राहिल्याने फायदा झाला. ते तिकडे गेल्याने मतेही गेली. नुकसानही झालं. आता ती मते येत आहे. त्यांना लांगूलचालन केलं. ते राजकारण त्यांनी स्वीकारलं. आमच्याकडे चेहऱ्याचा वाद नाही. जे मुख्यमंत्री असतात तेव्हा चेहऱ्याचा वाद नसतो. त्यांच्या नेतृत्वात निवडणूक होते. निवडणुकीनंतर कोण मुख्यमंत्री होणार हे सांगण्याचा अधिकार मला नाही. आमचं पार्लमेंट्री बोर्ड ठरवेल. आज सरकार म्हणून आम्ही एकत्र जातो.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;