ही शान कोणाची लालबागच्या राजाची….राजाचं मुखदर्शन पाहा लाईव्ह
लालबागच्या राजाचा मुखदर्शन सोहळा पाहण्याची संधी भाविकांना मिळत आहे. थोड्याच वेळात जगभरातील करोडो भाविकांना लालबागच्या राजाचे दर्शन होणार आहे. यंदा लालबागच्या राजाचे सजावट काय असणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.लालबागच्या राजाच्या दर्शनाला दरवर्षी भाविकांची प्रचंड मोठ्या रांगा लागलेल्या असतात.लालबागच्या राजाचं विलोभनीय रुप पाहण्यासाठी भाविक अगदी आतुर झालेले असतात. याची देही याची डोळा लालबागच्या राजाचे रुप आपल्या डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी भाविक कोणतेही कष्ठ घ्यायला तयार असतो. कारण राजाच्या केवळ दर्शनाने आपले सर्व विघ्नाचं हरण होणार याची त्याला खात्रीच असते. अशा लालबागच्या राजाचे डोळेभरुन रुप पाहण्याची संधी इंटरनेट धारकांना मिळणार आहे.
सालाबादप्रमाणे यंदाही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ लालबागच्या राजाचा गणेशोत्सव शनिवार दिनांक 7 सप्टेंबर 2024 ते मंगळवार 17 सप्टेंबर 2024 या कालावधीत साजरा करत आहे. त्यापुर्वी जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या लालबागचा राजाचे,प्रसिद्धी माध्यमांसाठी फोटो सेशन आज गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी ठिक 7 वाजता आयोजीत करण्यात आले आहे.लालबागच्या राजासाठी यंदा अग्निशमन दलाने यंदा मोफत सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. लालबागच्या राजाच्या मार्फत अनेक सामाजिक कामे देखील केली जातात.लालबागच्या राजातर्फे लायब्ररी, महत्वाच्या सर्जरीसाठी देखील अर्थसहाय्य केले जात असते. दरवर्षी लालबागच्या दानपेटीत भाविक कोट्यवधी रुपये दान करीत असतात असे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मानद सचिव सुधीर सिताराम साळवी यांनी म्हटले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List