Maharashtra Cabinet Decisions : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी बहीण योजना, पाऊस आणि शेतीवर चर्चा, 9 मोठे निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत 9 महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले. तसेच आणखी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. मराठवाड्यात ओला दुष्काळसदृष्य परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या या बैठकीत शेतकऱ्यांसाठी काही मोठी घोषणा होते का? याकडे राज्याचं लक्ष होतं. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाऊस, शेती या विषयी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत विविध विभागांसाठी अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय :
- सार्वजनिक बांधकाम : पुणे- छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार
- पशुसंवर्धन विभाग : अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार
- वस्त्रोद्योग विभाग : शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य
- कृषी विभाग : बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारले. विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान
- महिला व बालविकास : अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देणार. ३६ हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार
- कामगार विभाग : औद्योगिक कामगार न्यायालयातल्या न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते
- पशुसंवर्धन विभाग : थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ.
- जलसंपदा विभाग : धारूर तालुक्यातील सुकळी गावाचे विशेष भाग म्हणून पुनर्वसन करणार
- विधी व न्याय विभाग : काटोल, आर्वी, येथे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश न्यायालय, पैठण, गंगापूर येथे जिल्हा अतिरिक्त न्यायालय, हिंगोली स्वतंत्र न्यायिक जिल्हा करणार
मंत्रिमंडळ बैठकीत इतर चर्चा काय?
- मदत व पुनर्वसन : लाडकी बहिणी योजनेमुळे अन्य कोणत्याही योजना बंद होणार नाहीत. शेतकरी कुटुंबांना मदत बंद केल्याचे वृत्त चुकीचे
- कृषी विभाग : राज्यात १२१ टक्के पेरण्या
- जलसंपदा विभाग : राज्यातील मोठी धरणे २०१८ नंतर प्रथमच शंभर टक्के भरली
- महिला व बालकल्याण : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: सुमारे १ कोटी ६० लाख भगिनींना ४७८७ कोटींचे वाटप
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List