EXCLUSIVE : मुंबईत ठाकरे गटाच्या संभाव्य 22 उमेदवारांची नावं समोर, नेमका प्लॅन काय? आदित्य ठाकरे कुठून लढणार?
महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुढच्या दोन महिन्यांत विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात जोरदार घडामोडी सुरु आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांची मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठकांचं सत्र सुरु आहे. या बैठकीत सुरुवातीला मुंबईतील जागांबाबत निर्णय घेतला जात होता. या बैठकीत प्रत्येक पक्षाकडून वेगवेगळा दावा केला जात होता. मुंबईत विधानसभेच्या एकूण 36 जागा आहेत. या जागांपैकी ठाकरे गट 20 ते 22 जागांवर निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या संभाव्य 22 उमेदवारांची यादी टीव्ही 9 मराठीच्या हाती लागली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाची मुंबईत 22 नावांवर प्राथमिक चर्चा सुरु आहे. टीव्ही 9 मराठीकडे ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादीच हाती लागली आहे. तसेच ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनीदेखील याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
संभाव्य उमेदवारांची यादी
- वरळी मतदारसंघ – आदित्य ठाकरे
- दहिसर – तेजस्विनी घोसाळकर
- वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
- दिंडोशी – सुनील प्रभू
- विक्रोळी – सुनील राऊत
- अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
- कलिना – संजय पोतनीस
- कुर्ला – प्रविणा मोरजकर
- वडाळा – श्रद्धा जाधव
- जोगेश्वरी- अमोल कीर्तिकर
- चारकोप – नीरव बारोट
- गोरेगाव – समीर देसाई
- भांडूप – रमेश कोरगांवकर
- चांदिवली – ईश्वर तायडे
- दादर-माहिम – सचिन अहिर, विशाखा राऊत
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List