एसटी संप चिघळण्यासाठी पचतांराकित हॉटेलमध्ये प्लॅनिंग; गुणरत्न सदावर्तेंचा महाविकास आघाडीतील या बड्या नेत्यावर गंभीर आरोप

एसटी संप चिघळण्यासाठी पचतांराकित हॉटेलमध्ये प्लॅनिंग; गुणरत्न सदावर्तेंचा महाविकास आघाडीतील या बड्या नेत्यावर गंभीर आरोप

एसटी कर्मचाऱ्यांचा संप एकदाचा मिटला. सरकारने त्यांच्या मागण्यावर यशस्वी तोडगा काढला. त्यामुळे हा संप जास्त काळ चालला नाही. पण एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळण्यासाठी महाविकास आघाडीचे बडे नेते पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रयत्न करत होते असा गंभीर आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. त्यांनी ज्या काही संघटनांनी बंद केला होता त्याला कोणाचाच पाठिंबा नव्हता. आमचे 65000 कर्मचारी स्वतःहून उतरून काम करत होते, असा दावा केला.

सदावर्ते यांचा आरोप कुणावर?

मुख्यमंत्र्यांसोबत तोडग्याची बैठक होण्याच्या अगोदर संप पुढे जावा यासाठी पंचतारांकित हॉटेल मधून शरद पवार प्रयत्न करत होते. तसेच बिळातून बाहेर येऊन अनिल परब देखील संप कसा पुढे जाईल याविषयी बघत होते, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे.
पण यांच्या हाताला मी काही लागू दिलं नाही. जे काही बैठकीला आले होते त्यांना हायकोर्टच्या आदेशानुसार बसण्याची परवानगी देखील नव्हती परंतु गयावया करून त्यांना बैठकीला बसू दिलं. बैठकीला बसण्याचा अधिकार देखील त्यांचा काढून घेतला आहे, असा चिमटा त्यांनी काँग्रेस प्रणीत संघटनांना काढला. त्यामुळे सदावर्ते यांचा रोख कुणावर होता हे स्पष्ट झाले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको

त्यांनी श्रेय घेण्याची गरजच नाही कारण हे सर्व तेजाजी आमचा आहे कारण त्यांनी बैठकीमध्ये केवळ 5000 रुपयांची मागणी केली होती आणि आम्ही साडेसहा हजार रुपये मिळवून दिले. तसेच जे संपामध्ये कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यांच्यावरती कारवाई करू नये अशी देखील मागणी आम्ही केली होती पण त्यांनी तोंडातून शब्द देखील काढला नाही म्हणजे ते किती कर्मचार्‍यांच्या विरोधात आहे ते दिसून येते, असा आरोप त्यांनी केला.

सातव्या वेतन आयोगासाठी प्रयत्न

काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काल बैठक पार पडली. ज्या काही संघटनांनी बंद केला होता त्याला कोणाचाच पाठिंबा नव्हता. आमचे 65000 कर्मचारी स्वतःहून उतरून काम करत होते. आम्ही आमचं बैठकीत म्हणणं मांडलं तसेच सातवा वेतन आयोग देखील लागू करावा याविषयी देखील आमच्या इथून पुढे प्रयत्न सुरू राहतील. काँग्रेसच्या कातडीचे काही वयोवृद्ध आणि रिटायर्ड झालेली माणसं होती त्यांना जयश्री पाटलांनी चांगला प्रसाद दिला आहे, असे ते म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;