MSRTC Employees Strike : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक सुरु, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार?

MSRTC Employees Strike : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक सुरु, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार?

राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला एसटी कामगार संयुक्त कृती समितीचं शिष्टमंडळ उपस्थित आहेत. तसेच भाजप आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, वकील गुणरत्न सदावर्ते, एसटी कष्टकरी जनसंघच्या जयश्री पाटील या देखील बैठकीला उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात यशस्वी होणार का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

एसटी महामंडळ संप प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव डॉ. आय एस चहल, अपर मुख्य सचिव विकास खारगे, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ पी गुप्ता, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सुमारे २६ एस टी कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?

एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यापैकी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच महागाई भत्ता मिळावा. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच घरभाडं भत्ता मिळावा. एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट 5 हजार रुपयांची वेतनवाढ मिळावी, अशा आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत.

याआधी सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या मनधरणीत अपयश

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीआधी एसटी कर्मचाऱ्यांची सरकारसोबत काल देखील बैठक पार पडली होती. सरकारकडून मंत्री उदय सामंत यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत चर्चा केली होती. पण या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात उदय सामंत यांना यश आलं नव्हतं. उदय सामंत यांनी गणेशोत्सव असल्याने संप मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच सरकार तुमच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं होतं. पण तरीदेखील त्या बैठकीत उदय सामंत यांना कर्मचाऱ्यांची मनधरणी करण्यात यश आलं नव्हतं. ती बैठक निष्फळ ठरली होती. त्यामुळे आजच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;