Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : दानवेंची कबुली, ठाकरे सोडून गेल्याने भाजपचं नुकसान, पाहा Video

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : दानवेंची कबुली, ठाकरे सोडून गेल्याने भाजपचं नुकसान, पाहा Video

भाजपचे नेते रावसाहेब दानवेंचं हे वक्तव्य फार मोठं आहे. अजित पवारांच्या येण्यामुळं भाजपचं नुकसान झालं नाही..तर उद्धव ठाकरे धोका देवून काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यानं आमचं नुकसान झालं, असं बेधडकपणे रावसाहेब म्हणालेत. TV9शी बोलताना, दानवेंनी ठाकरेंबद्दल धोका शब्द वापरला. तर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतही दानवेंनी उद्धव ठाकरेंमुळंच भाजपचं नुकसान झाल्याचं म्हटलं. लोकसभा निवडणुकीत अजित पवार आमच्यासोबत येण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या जाण्याचा आम्हाला खूप फटका बसला. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर महाराष्ट्रात थेट लोकसभेचीच सार्वत्रिक निवडणूक झाली. ज्यात महाराष्ट्रानं महाविकास आघाडीलाच पसंती दिली. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अधिक फायदा झाला.

महाराष्ट्रातील 48 जागांपैकी महाविकास आघाडीला 30 आणि सांगलीत मूळ काँग्रेसचेच पण अपक्ष लढलेले विशाल पाटील विजयी झाले आता ते काँग्रेससोबतच आहेत. म्हणजेच मविआचा आकडा 31वर गेलाय तर महायुती अवघ्या 17 जागांवर आटोपली. रावसाहेब दानवे फक्त भाजपचेच नेते नाहीत..तर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं त्यांना, निवडणूक संचालन समितीचं प्रदेश संयोजक केलंय. म्हणजे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या बरोबरीचं पद दानवेंना दिलंय. अशा वेळी, उद्धव ठाकरेंमुळं भाजपचं नुकसान असं बोलणं म्हणजे, महाविकास आघाडीला आयतीचं संधी देणं आहे.

पाहा व्हिडीओ:-

लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा फटका, जालन्यात स्वत: रावसाहेब दानवेंनाही बसला. काँग्रेसच्या कल्याण काळेंनी भाजपच्या दानवेंना 1 लाखांहून अधिक मतांनी पराभूत केलं. आता, विधानसभेतही जरांगे फॅक्टरचा परिणाम दिसेल का?, या प्रश्नावर दानवेंचं काय म्हणणंय तेही ऐका. विधानसभेच्या निवडणुका 2 अडीच महिन्यांवर आल्यात. सध्या जागा वाटपावरुन महायुती आणि महाविकास आघाडीच्या जोर बैठका सुरु आहेत. त्यातच दानवेंनी, ठाकरेंमुळं भाजपचं नुकसान म्हणणं म्हणजे, महाविकास आघाडीला राजकीय मायलेज मिळवून देण्यासारखं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;