लाडकी बहीण योजनेवरुन मुख्यमंत्र्यांचा इशारा, गैरप्रकार कराल तर सावधान

लाडकी बहीण योजनेवरुन मुख्यमंत्र्यांचा इशारा, गैरप्रकार कराल तर सावधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गैरप्रकार करणाऱ्या दलालांना इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, कुठलाही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही.मी साताऱ्याचे कलेक्टर यांच्याशी बोललो. माहिती घेतली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आमच्या गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातल्या बहि‍णींसाठी ही योजना आहे. यामध्ये कोणीही दलाल, एजेंट कुठे मस्ती करतील आणि भ्रष्टाचार करतील तर त्यांना कुठलाही थारा नाही. यांना सरळ जेलमध्ये टाकणार. माझा हा इशारा समजून घ्यावा.
अधिकाऱ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करावे.कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्य कुटुंबातील बहिणींच्या नावावर कोणी पैसे खात असेल, भ्रष्टाचार करत असेल तर त्याला तुरुंगाशिवाय दुसरी जागा नाही.

एसटी संपाबाबत चर्चा सुरु आहे. मागे एक बैठक झाली आहे. उद्याही बैठक आहे. गणपती आहेत लोकांचा सण आहे त्यामुळे एसटीच्या कर्मचाऱ्यांना माझे आवाहन आहे लोकांना वेठीस धरु नये. तुमच्याबद्दल सरकार सकारात्मक आहे. सरकार तुमच्यासोबत आहे. ते सरकारचा एक भाग आहेत. कुणीही संपावर जाऊ नये असं आवाहन करतोय.

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे दैवत आहेत. ते आमच्या हृदयात आहेत. झालेली घटना दुर्दैवी आहे. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कारभार करतो. या घटनेचं राजकारण करणं दुर्दैवी आहे. कोणी कोणी जोडो मारे आंदोलन केले. मोठे नेते रस्त्यावर येऊन जोडे मारत होते हे दुर्दैवी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;