मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातील निष्ठावंत कार्यकर्ते भाजपमध्ये, आमदाराकडून शिंदेंना धक्का

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडातील निष्ठावंत कार्यकर्ते भाजपमध्ये, आमदाराकडून शिंदेंना धक्का

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. परंतु महायुतीमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु असते. गेल्या काही दिवसांपासून भाजप अन् शिंदे गटाकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला लक्ष केले गेल्याचे समोर आले. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नाही, असा संदेश समोर आला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडात भाजपने धक्का दिला आहे. ठाण्यातील एकनाथ शिंदे यांचे निष्ठवंत कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले आहे.

लोकसभेच्या वेळी भाजपमध्ये नाराजी

राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच बालेकिल्ल्यात ठाणे शहरात महायुतीमध्ये अलबेल नसल्याच दिसून आले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपने देखील ठाणे लोकसभेवर त्यांचा दावा ठोठावला होता. हा वाद अनेक दिवस चालला. परंतु अखेर एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली. शिंदे सेनेचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये नाराजी दिसून आली होती. कार्यकर्त्यांमधील ही नाराजी दूर करण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मैदानात उतरावे लागले. त्यानंतर भाजपमधील नाराजी दूर झाली.

कोणी केला भाजप प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक संजय भोईर व देवराम भोईर यांच्या कार्यकर्त्यांनी आज भाजपामध्ये पक्षप्रवेश केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का समजला जात आहे. आमच्या कामाला प्रेरित होऊन आणखीन कार्यकर्ते भाजपमध्ये येतील असे यावेळी पक्ष प्रवेश केलेल्या मेघनाथ घरत म्हणाले आहेत. भारतीय पक्षाचे ज्याप्रमाणे शिस्तबद्ध काम चालू आहे, भारतीय जनता पक्षामध्ये संधी मिळते, कामाची शब्बासकी ही मिळते, या भावनेने कार्यकर्ते येत असतात असे भाजप आमदार संजय केळकर यांनी सांगितले आहे.

महायुतीमधील दोन पक्षातील कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जात आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात वर्चस्वाची लढाई सुरु झाल्याचे हे संकेत आहेत. भाजप ठाणे मतदार संघात आपला दावा अधिक मजबूत करत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;