काँग्रेसने शिवाजी महाराजांसंदर्भात काय, काय केले…फडणवीस यांनी ती उदाहरणे सांगत उबाठा सेनेला आणले अडचणीत

काँग्रेसने शिवाजी महाराजांसंदर्भात काय, काय केले…फडणवीस यांनी ती उदाहरणे सांगत उबाठा सेनेला आणले अडचणीत

मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याप्रकरणी राज्यात महाविकास आघाडीकडून रविवारी आंदोलन करण्यात आले. राज्यातील प्रत्येक शहरांत जोडे मारो आंदोलन झाले. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपने आज महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी आंदोलन केले. यावेळी उपमुख्यमंत्री अन् भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्ला केला. काँग्रेसने शिवाजी महाराजांसंदर्भात काय, काय केले, त्याची उदाहरणे सांगत आता काँग्रेसला माफी मागण्यास लावणार का? असा प्रश्न विचारला.

ठाकरे मूग गिळून गप्प का?

पहिली गोष्ट तर उद्धव ठाकरेंना सवाल आहे की, नेहरूंनी शिवाजी महाराजांच्याबद्दल डिस्कव्हरी ऑफ इंडियात जे लिहिलंय त्याबद्दल काँग्रेसला माफी मागायला लावणार का? मध्यप्रदेशात काँग्रेसने बुलडोझर लावून शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला त्यावर पवार ठाकरे मूग गिळून बसले आहेत. त्यावर का बोलत नाही. कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाने शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, त्याबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. आधी त्याचं उत्तर दिलं पाहिजे, असा हल्ला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

काँग्रेसने चुकीचा इतिहास शिकवला

इतके वर्षे आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की महाराजांनी सुरत लुटली. परंतु खरा इतिहास तो नाही. महाराजांनी सुरत लुटली नव्हती तर तो खजिना घेऊन योग्य त्या लोकांना दिला होता. हा स्वराज्याचा खजिना होता. त्यांनी आक्रमण केलं होतं. पण त्यांनी लूट कधी केली नव्हती. महाराज काही लूट करायला गेले नव्हते, पण असा इतिहास आम्हाला शिकवला गेला. इतकी वर्षे काँग्रेसने हा इतिहास शिकवला त्याची काँग्रेसला माफी मागायला सांगणार आहात की त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात हे सांगितलं पाहिजे, असा टोला फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

उद्धव ठाकरे यांनी याची उत्तरे द्यावी

  1. नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांबद्दल जे लिहिले त्यावर माफी मागायला लावणार का?
  2. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकारने शिवरायांचा पुतळा बुलडोजर लावला, त्यावर उद्धव ठाकरे का मूग गिळून बसलेत?
  3. कर्नाटकात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवला त्या बद्दल ते एक शब्दही का बोलत नाहीत?

भाजपचे राज्यभरात आंदोलन

महाराजांच्या पुतळ्यावरून महाविकास आघाडीकडून गलिच्छ राजकारण सुरु आहे. त्याच्या विरोधात भाजपने रविवारी राज्यभर आंदोलन केले. काही शहरांमध्ये मौन बाळगून विरोध दर्शवीला आहे. काही ठिकाणी भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदवला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;