Rain Alert: राज्यात मुसळधार असताना मुंबई-पुण्यात काय असेल पावसाची परिस्थिती

Rain Alert: राज्यात मुसळधार असताना मुंबई-पुण्यात काय असेल पावसाची परिस्थिती

राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, नांदेड या ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पाऊस वायव्येकडे सरकत आहे. जळगाव, नाशिक, जालना, औरंगाबाद, बीड, अकोला या ठिकाणी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईत मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पुणे शहरात, हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मध्यम ते तीव्र पाऊस होऊ शकतो. पुण्याच्या घाट भागात आणि पश्चिम भागात ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या घाट परिसरात पुढील 4 दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे दृश्यमानता देखील खराब राहू शकते.

राज्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्याने पूरसदृश्य स्थिती तयार झाली आहे. मराठवाड्यात देखील अशीच स्थिती आहे. पुढच्या दोन दिवसात पाऊस ओसरण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. येथे ऑरेंज अलर्ट असेल. धुळे आणि नंदूरबारमध्ये रेड अलर्ट आहे. नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.

सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात काही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो. तर कोकणात आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्रतिसाद टीम यवतमाळमध्ये दाखल झाली आहे. वाढता पावसाचा जोर लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून राज्य आपत्ती व्यवस्थापन टीमला पाचारण करण्यात आले आहे.

नागपुरात सकाळपासून रिमझिम पाऊस सुरु होता. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर वाढलाय. शहरातील अनेक भागात जोरदार पावसाचा सरी. कोसळत आहेत. हवामान विभागाकडून आज अकोला, यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तेच पूर्व आणि पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरकरांना उकाड्या पासून दिलासा मिळाला असून वातावरणात गारवा निर्माण झालाय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;