लालबागमध्ये भीषण अपघात, भर गर्दीत बस घुसली, 8 जखमी; कारण ऐकाल तर..

लालबागमध्ये भीषण अपघात, भर गर्दीत बस घुसली, 8 जखमी; कारण ऐकाल तर..

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना मुंबईत खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली आहे. मात्र याच दरम्यान मुंबईतील लालबाग परिसरात एक भयानक घटना घडली आहे. लालबागच्या गजबजलेल्या परिसरात एक बस घुसली आणि अनेक प्रवाशांना तसेच गाड्यांना धडक दिली. या भीषण अपघातात 8 ते 9 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. एका मद्यधुंद प्रवाशाने ड्रायव्हरशी वाद घालत बसचे स्टिअरिंग कसेही फिरवल्याने हा अपघात झाल्याचे समजते. यामध्ये अनेक पादचारी जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात एवढा भीषण होत की रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक बसून त्यांचेही मोठे नुकसान झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री 8.30 च्या सुमारास हा अपघात घडला. बेस्ट बसची मार्गिका क्रमांक 66 ही बस लालबागहून जात होती. बसचे ड्रायव्हर कमलेश प्रजापती ( वय 40) हे चालवत असलेली बस गणेश टॉकीजजवळ पोहोचली, मात्र तेव्हाच दत्ता मुरलीधर शिंदे ( वय 40) याने जबरदस्तीने स्टीअरिंग व्हीलवर ताबा मिळवत ते डावीकडे फिरवले. मात्र चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस धाडकन समोरच्या दोन वाहनांवर धडकली. तसेच काही पादचाऱ्यांनाही बसची जोरात धडक बसली. अचानक बस वेडीवाकडी चालू लागल्याने तेथील नागरिक घाबरले आणि एकच पळापळ झाली. यामध्ये आठ जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यानंत बस चालकाने वेळीच नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमींना उपचारांसाठी लगेचच जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांना फ्रॅक्चरही झाल्याची माहिती मिळत आहे, तर इतर नागरिक किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातास कारणीभूत ठरलेला, मद्यधुंद प्रवासी दत्ता शिंदे याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करणार येण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितलं. शिंद याने बस ड्रायव्हरशी वाद घातला. बस गणेश टॉकीज परिसरात पोहोचली आणि तेवढ्यात त्याने अचानक स्टेअरिंग पकडलं. त्यामुळे चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि हा अपघात घडला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;