मालवणमधील पुतळा सरकारच्या भ्रष्टचाराचा नमूना, शरद पवार यांचा महायुतीवर हल्लाबोल

मालवणमधील पुतळा सरकारच्या भ्रष्टचाराचा नमूना, शरद पवार यांचा महायुतीवर हल्लाबोल

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. त्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे रविवारी राज्यभर आंदोलन केले. मुंबईत झालेल्या आंदोलनाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मालवणमधील शिवाजी महाराजांचा उभारण्यात आलेला पुतळा म्हणजे महायुती सरकारचा भ्रष्टाचाराचा नमूना असल्याचा हल्ला शरद पवार यांनी केला.

काय म्हणाले शरद पवार

महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याची भूमिका राज्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाऱ्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे धक्कादायक विधान केले. राज्यभरात असलेले शिवाजी महाराजांचे पुतळे लोकांना प्रेरणा देत असतात. परंतु मालवणमध्ये उभा केलेला पुतळा भ्रष्टाचाराचा नमूना आहे. तो पुतळा उभारण्यात भ्रष्टाचार झाला आहे. हा जनमानसात समज निर्माण झाला आहे. हा शिवप्रेमी लोकांचा अपमान करण्यात आला. त्यामुळे आम्ही सरकारचा निषेध करण्याची भूमिका घेतली, असे शरद पवार यांनी म्हटले.

कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार

राज्यात देशात शिवद्रोही सरकार आहे. महाराजांच्या नावाने पेशवाई सुरू आहे. कमिशनखोरी आणि भ्रष्टाचार केला. महाराजांचा अपमान करण्याचं काम सरकारने केलं. मालवणमध्ये महाराजांचा पुतळ पडला. तो फक्त महाराजांचा पुतळा नव्हता, तर महाराष्ट्राचा धर्म होता. शिवाजी महाराज आमचे दैवत आहे. महाराजांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहोत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

…या माफीवीरांना घरचा रस्ता दाखवा

शरद पवार तब्येत बरी नसतानाही आले आहे. वयाचे बंधन न ठेवता महाराजांच्या अपमानाचा निषेध करण्यासाठी शाहू महाराज आणि शरद पवार आले आहेत. मोदींनी माफी मागितली, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली तरी आम्ही राजकारण करत असल्याचं सांगितलं जात आहे. ज्या दिवशी महाराजांचा अपमान झाला, तेव्हाच राज्यातील जनतेने शिवाजी महाराजांची माफी मागितल. आम्ही शिवद्रोही सरकार चुकून निवडून दिलं, खोके सरकार निवडून दिलं याची माफी जनतेने मागितली आहे. आम्ही पुन्हा हे सरकार राज्यात येऊ देणार नाही अशी शपथ जनतेने घेतली आहे.

जे माफीवीर लोकं आहेत, मोदी असो की शिंदे असो हे केवळ निवडणुकीसाठी माफी मागत आहेत. या माफीवीरांना घरचा रस्ता दाखवायचा आहे. हा फुले शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र घडवायचा आहे. आपल्याला या शिवद्रोही सरकारला चलेजावचा नारा देणार आहोत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;