“फक्त जोडे मारा आंदोलन करतोय, शिवरायांचा काळ असता तर थेट…”, ठाकरे गटाचा खासदार आक्रमक

“फक्त जोडे मारा आंदोलन करतोय, शिवरायांचा काळ असता तर थेट…”, ठाकरे गटाचा खासदार आक्रमक

Sanjay Raut Press Conference :  सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. यानंतर सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून आज आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. महाविकासाघाडीतर्फे आज जोडे मारा आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईतील हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकासआघाडीचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह महाविकासआघाडीतील अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहे. मात्र या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “महाराष्ट्राला जर त्यांच्या भावना व्यक्त करायच्या असतील, तर तुम्ही महाराष्ट्राला थांबवू शकत नाही. आज फक्त तुमचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता”, अशा शब्दात संजय राऊत यांनी महायुती सरकारवर टीका केली.

“मालवणाचा जो पुतळा कोसळला हा सरळ भ्रष्टाचार”

“महाराष्ट्रात आज शिवद्रोही सरकार आहे. या विरोधात राज्यभर आंदोलन केले जाईल. याची सुरुवात मुंबईतील जोडे मारा आंदोलनापासून होईल. ज्या पद्धतीने सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि काही मंत्र्‍यांनी शिवरायांचा अपमान केला, त्यांनी माफी मागितली. मालवणाचा जो पुतळा कोसळला हा सरळ भ्रष्टाचार आहे. आपपल्या लोकांना काम देण्यासाठी जी स्पर्धा सुरु आहे त्यातून हा पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी माफी मागितली असेल, हा त्यांचा प्रश्न आहे. पण माफी मागून हा प्रश्न सुटणारा नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.

“…तर तुमचा कडेलोट केला असता”

महाराष्ट्राला जर त्यांच्या भावना व्यक्त करायच्या असतील, तर तुम्ही महाराष्ट्राला थांबवू शकत नाही. आज फक्त तुमचा निषेध करण्यासाठी आंदोलन आहे. लोकशाहीत अशाप्रकारे आंदोलन करण्याला परवानगी द्यावी लागते. जर तुम्ही ती देणार नसलात तर तुमची ही दडपशाही, झुंडशाही आहे. आज रविवार आहे आणि ज्या भागात आंदोलन होणार आहे, तो संपूर्ण भाग सुट्टीमुळे बंद आहे. तरीही जर तुम्ही आंदोलनाला परवानगी देत नसाल तर तुमच्या मनात हुकूमशाही वृत्ती वाढली आहे. आम्ही फक्त जोडे मारा आंदोलन करत आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असता तर तुमचा कडेलोट केला असता, हे लक्षात ठेवा, असाही घणाघात संजय राऊत यांनी केला.

“एवढी भीती का आणि कशासाठी?”

आमच्या कार्यकर्त्यांच्या बस थांबवण्याचा प्रयत्न ठिकठिकाणी सुरु आहे. आज लोकलचा मेगाब्लॉक आहे आणि मुद्दाम तो वाढवण्यात आला आहे. आम्ही कार्यकर्त्यांना वाहनाने यायला सांगितलं. पण सकाळपासून वाहनांना अटकाव केला जात आहे. त्यांना थांबवलं जात आहे. एवढी भीती का आणि कशासाठी? तुम्ही आम्हाला आंदोलन करु देत नाहीत. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आंदोलन घ्यायचा अधिकार नाही, असेही संजय राऊतांनी म्हटले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;