महाविकासआघाडीचे आज जोडे मारा आंदोलन, गेटवे पर्यटकांसाठी बंद; हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया परिसराला छावणीचे स्वरुप

महाविकासआघाडीचे आज जोडे मारा आंदोलन, गेटवे पर्यटकांसाठी बंद; हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया परिसराला छावणीचे स्वरुप

MahaVikasAghadi Protest in Mumbai : सिंधुदुर्गातील मालवण परिसरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. यामुळे शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणावरुन विरोधकही आक्रमक झाले आहे. महाविकासआघाडीतर्फे आज सरकारला जोडे मारा आंदोलन केले जाणार आहे. आज रविवारी 1 सप्टेंबर रोजी महाविकासआघाडी सरकारतर्फे हे ‘जोडे मारा’ आंदोलन केले जाईल. गेट वे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाजवळ हे आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आज हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

महाविकासाघाडीतर्फे आज जोडे मारा आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे नाना पटोले यांसह महाविकासआघाडीतील अनेक दिग्गज नेते सहभागी होणार आहे. राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यांत कोसळल्याने राज्यभरातील शिवप्रेमी दुखावले आहेत. या प्रकरणी महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी या आंदोलनाची हाक दिली आहे.

महाविकासआघाडीचा मोर्चा हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत काढण्यात येणार आहे. यानंतर गेटवे ऑफ इंडियाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला पोलिसांची अद्याप परवानगी दिलेली नाही. पण तरीही महाविकासआघाडीतील नेते आंदोलनावर ठाम आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून हुतात्मा चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा संपूर्ण मुंबईत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

नो पार्किंग झोन

महाविकासआघाडीच्या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडिया परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त पाहायला मिळत आहे. या परिसरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बॅरिकेटींग करण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात फौजफाटाही तयार ठेवण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे. तसेच हुतात्मा चौकापासून गेट ऑफ इंडियापर्यंतचा परिसर नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.

पर्यटकांसाठी गेट वे ऑफ इंडिया बंद

त्यासोबत गेट वे ऑफ इंडिया हा परिसर सकाळी 10 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असणार आहे. त्यानंतर पोलिसांकडून पर्यटकांसाठी गेट वे ऑफ इंडिया बंद केले जाणार आहे. महाविकासआघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या आंदोलनाला पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नाही. तरी प्रमुख नेते आंदोलनात सहभागी होणार असल्याने पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

महायुतीकडूनही राज्यभरात आंदोलन

याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने याबद्दल ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘राजे, आम्ही येत आहोत, तुमच्या चरणी नतमस्तक व्हायला, महाराष्ट्राचा स्वाभिमान जागवायला,’ असे त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनाला निषेध करण्यासाठी महायुतीकडूनही राज्यभरात आंदोलन केले जाणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;