Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : देवाभाऊ, योजना बंद होऊ होणार नाही, पाहा Video

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : देवाभाऊ, योजना बंद होऊ होणार नाही, पाहा Video

लाडकी बहीण योजनेविरोधात कोर्टात कुणाचा माणूस गेला., यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये वाद पेटलाय. मोफतच्या योजना बंद करुन मुलभूत प्रश्नांवर पैसा खर्च करावा. यासाठी नागपूरचे रहिवाशी अनिल वडपल्लीवारांनी हायकोर्टात याचिका केलीय. यावर फडणवीसांनी आरोप केलाय की वडपल्लीवार हे काँग्रेस समर्थक असून पटोले आणि सुनिल केदारांचे निकटवर्तीय आहेत. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या दाव्यानुसार वडपल्लीवारांचा काँग्रेसशी कोणत्याही पातळीवर संबंध नसून ते काँग्रेसचे सदस्य सुद्धा नाहीत.

एका माहितीनुसार अनिल वडपल्लीवार यांनी काँग्रेस आमदार सुलभा खोडकेंसोबतही काही काळ काम केल्याची माहिती आहे. मात्र त्या सुलभा खोडके लवकरच अजित पवार गटात येणार असल्याचं खुद्द अजितदादांनीच सांगितलंय. विशेष म्हणजे सुलभा खोडकेंचे पती हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. साऱ्या आरोपांवर अनिल वडपल्लीवारांशीच आम्ही संपर्क केला. त्यावर आपण आयुष्यात कुणाचेही पीए राहिलेलो नसून लवकरच साऱ्या आरोपांवर उत्तर देणार असल्याचं वडपल्लीवारांनी म्हटलंय.

मुख्यमंत्री शिंदेंनी दावा केलाय की लाडक्या बहिणीविरोधात कोर्टात गेलेल्यांची याचिका कोर्टानं रद्द केलीय. मात्र दुसरीकडे आम्ही कोर्टात चांगला वकील देवून लाडकी बहिण योजना बंद होऊ देणार नाहीत, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. दरम्यान लाडक्या बहि‍णींच्या कार्यक्रमासाठी सरकारनं प्रत्येक बीडीओ अधिकाऱ्यांना २ हजार महिला जमवण्याचं टार्गेट दिलंय. इव्हेंटच्या माध्यमातून सरकारच्य तिजोरीतून कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी सुरु असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.

आज लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांची मत मिळवण्यासाठी सरकारी तिजोरी साफ करत आहेत. गर्दी जमवण्यासाठी प्रत्येक व बीडीओ ला 2000 महिलांचा टारगेट देण्यात आलं आहे. योजना लोकप्रिय असत्या तर महिला स्वतःहून आल्या असत्या सरकारी तिजोरी जशी काही बाप जाण्याची मिळकत आहे असं वागत आहे. सामान्य माणसांचा पैसा स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी वापराल का स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी ५०-५० बसेस भरून आणण्याचे बिडीओला टार्गेट दिले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;