बलात्कार आणि जीवे मारण्याची वारंवार धमकी; संजय राऊतांचं नाव घेत महिलेचं ईडीला पत्र

बलात्कार आणि जीवे मारण्याची वारंवार धमकी; संजय राऊतांचं नाव घेत महिलेचं ईडीला पत्र

पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीला पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांकडून वारंवार धमक्या देण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. संजय राऊतांकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे. मला वारंवार जीवे मारण्याची धकमी दिली जात आहे. तसंच बलात्कार करण्याचीही धमकी दिली जात आहे, असं स्वप्ना पाटकर यांनी या पत्रात म्हटलं आहे. या पत्रामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

स्वप्ना पाटकरांचं ईडीला पत्र

पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या पश्चिम विभागाच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी आपल्याला वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचं म्हटलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात मी साक्ष दिली आहे. या साक्षीकील माझे जबाब मी बदलावेत, यासाठी मला धमकावलं जात आहे, असा मजकूर असणारं स्वप्ना पाटकर यांनी ईडीला लिहिलं आहे.

स्वप्ना पाटकर यांच्या पत्रात काय?

पत्राचाळघोटाळा प्रकरणातील माझा जबाब बदलावायासाठी माझ्यावर दबाव आहे. या प्रकरणातील आरोपी संजय राऊत यांच्याकडून मला वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. माझ्यावर बलात्कार केला जाईल, अशीही धमकी दिली जात आहे. मी मुद्दामहून ही बाब आपल्या लक्षात आणून देत आहे. माझं विधान बदलण्यासाठी दबाव टाकला जात आहे. आरोपी संजय राऊत आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर काही जमिनी आणि मालमत्तेसाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे, असं या पत्रात स्वप्ना पाटकर यांनी म्हटलं आहे.

चार दिवसांआधी स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरे यांनाही पत्र लिहिलं होतं. यातही त्यांनी संजय राऊतांकडून दबाव असल्याचं म्हटलं होतं. महिला सुरक्षेवर बोलत असताना संजय राऊतांनी जे माझ्यासोबत केलं. त्यावर बोला. महिला सुरक्षितते बद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला. पण माझ्यासोबत जे सुरु आहे, ते थांबावं यासाठीही प्रयत्न करा, असं म्हणत स्वप्ना पाटकर यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;