अजितदादांचं ठरलंय! विधानसभेला ‘इतक्या’ जागांवर लढायचं; काँग्रेसच्या 3 आमदार पक्षप्रवेश निश्चित

अजितदादांचं ठरलंय! विधानसभेला ‘इतक्या’ जागांवर लढायचं; काँग्रेसच्या 3 आमदार पक्षप्रवेश निश्चित

विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात जागावाटपांच्या चर्चांना उधाण आलं आहे. कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी किती जागांवर लढणार याचा आकडा सांगितला आहे. आपल्याकडे असणाऱ्या 54 जागांवर तर आपण लढायचं आहेच पण एकूण 60 जागांवर आपल्याला काम करायचंय, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे. मुंबईत काल संध्याकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी हे सूचक विधान केलं आहे.

कोण- कोण अजित पवारांच्या संपर्कात?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण पक्षांतर करण्याची शक्यता आहे. अशातच अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षात अनेकजण प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दिकी, नाशिकच्या इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सुलभा खोडके हे काँग्रेसचे आमदार आपल्यासोबतच आहेत, असं अजित पवार म्हणाले. त्यामुळे काँग्रेसचे तीन आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित झालं आहे.

बातमी अपडेट होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;