वांद्रे – गोवा व्हाया बोरीवली ट्रेन चाकरमान्यांसाठी की गोवा पर्यटनासाठी, चाकरमान्यांचा सवाल ?

वांद्रे – गोवा व्हाया बोरीवली ट्रेन चाकरमान्यांसाठी की गोवा पर्यटनासाठी, चाकरमान्यांचा सवाल ?

रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते गोवा ( मडगाव) व्हाया वस‌ई अशी कायमस्वरूपी ट्रेन सूरु झाली आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील चाकरमान्यांना गोव्यात पर्यटनासाठी जाण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. परंतू कोणत्याही गाडीचे आरक्षण IRCTC च्या webside वर सकाळी 8 वाजता उघडते.10115 या गाडीचे फक्त एक दिवस आधी आरक्षण सुरु करण्याचा नक्की उद्देश काय? IRCTC निकषांप्रमाणे सकाळी 8 वाजता आरक्षण आजवर सुरु होत आले आहे, पण IRCTC चे सगळे नियम धाब्यावर बसवून या गाडीचे आरक्षण दुपारी 12 वाजता सुरु केले होते…हे कोणत्या नियमात बसते? असा सवाल प्रवाशी बळीराम राणे यांनी केला आहे.असं म्हटल जातं ही खासदार पियूष गोएल यांची वचनपूर्ती आहे.हरकत नाही पण त्याकरीता रेल्वेचे नियम धाब्यावर बसवायचे काय? असाही सवाल त्यांनी केला आहे.

वैभववाडी आणि कुडाळ थांबा का नाही ?

दुसरीकडे म्हणजे कोकण आणि कोकणवासीयांकरता ट्रेन क्रमांक 10115 ची काल ट्रायल रन करण्यात आली.  जर चाकरमान्यांसाठीही ट्रेन सोडल्याचे सांगितलं जातंय मग या गाडीला वैभववाडी आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा का दिला नाही ? दुसरं म्हणजे ही गाडी गोव्यात पर्यटनासाठी ( मडगाव ) जाणाऱ्यांची सोय पाहून तर सोडली नाही ना ? असा संशय कोकणवासीयांनी व्यक्त केला आहे. गोयल यांचे कोकणवासीयांनावर एवढेच प्रेम ओतू जात असेल तर या गाडीला वैभववाडी आणि कुडाळ येथे थांबा द्यावा अशी मागणी बळीराम राणे यांनी केली आहे. एवढी वर्षे पश्चिम उपनगरातील चाकरमानी गाडीची मागणी करीत होते, आता त्यांची मागणी पूर्ण झाली हेच काय ते समाधान मानायचे असे राणे यांनी म्हटले आहे.

नव्या गाडीचा मार्ग हा वांद्रे-बोरिवली -वसई-रोहा-मडगाव असा असणार आहे. या गाडीला एकूण 16 LHB स्वरुपाचे डबे आहेत. नवीन गाडी आठवड्यातून दोन दिवस म्हणजेच मंगळवार आणि गुरुवार सकाळी 7.40 वाजता मडगाव (Goa) येथून सुटेल आणि वांद्रे येथे रात्री 23.40 वाजता पोहोचेल. तर परतीची गाडी वांद्रे येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 6.50 वाजता सुटेल आणि मडगाव येथे रात्री 22.00 वाजता पोहोचेल. दरम्यान सध्या ही गाडी वांद्रे, बोरीवली, वसई, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव असे थांबे दिले आहेत.

दर आठवड्याला बुधवार आणि शुक्रवारी सुटणार

गुरुवार 29 ऑगस्ट रोजी दुपारी 1.00 वाजता बोरीवलीवरून कोकणात जाण्यासाठी सोडण्यात येणाऱ्या ट्रेनचा नं 09167 असून त्याचे रिझर्वेशन बुधवार 28ऑगस्ट रोजी दुपारी 12.00 वाजता सुरु होणार अशी माहिती भाजपाच्या नेत्यांनी समाजमाध्यमात पसरवली होती. परंतू ही ट्रेन आता हीच ट्रेन पुढील आठवड्यापासून दर बुधवार आणि शुक्रवार सकाळी 6.50 वाजता वांद्रे (गाडी क्रमांक 10115) सुटून सकाळी 7.23 वा बोरीवली येथे येईल. तसेच दर मंगळवार आणि गुरुवारी सकाळी 7.40 वा. मडगाव (गाडी कम्रांक 10116) वरुन सुटेल असे म्हटले जात आहे.

स्थानके :

वांद्रे, बोरीवली, वसई, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;