शिल्पकार जयदीप आपटे फरार, कुटुंबाला मात्र पोलीस संरक्षण, चौकशीत कुटुंबिय म्हणाले…

शिल्पकार जयदीप आपटे फरार, कुटुंबाला मात्र पोलीस संरक्षण, चौकशीत कुटुंबिय म्हणाले…

jaydeep apte: मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटे सध्या फरार आहे. त्यांच्या तपासासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहे. त्या सर्वांकडून त्याचा शोध सुरु आहे. परंतु जयदीप आपटे अजून मिळाला नाही. दुसरीकडे त्याच्या ठाणे येथील निवासस्थानी त्याचे कुटुंबिय परतले आहे. त्याच्या निवासस्थानी पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त ठेवला आहे. गुरुवारी त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडने आंदोलन केले होते. त्यानंतर त्याच्या निवासस्थानावर सुरक्षा तैनात केली आहे.

कल्याण बाजार पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जयदीप आपटे यांच्या निवासस्थानी गुरुवारी संभाजी ब्रिगेडकडून आंदोलन केले होते. त्याच्या निवासस्थानी अंडीसुद्धा फेकली होती. यावेळी त्यांच्या राहत्या घरी कोणी नसल्यामुळे अनुचित प्रकार टाळला. मात्र आता जयदीप आपटे याच्या पत्नी शहापूर येथून परत आल्या आहेत. त्यांनी संरक्षणाची मागणी केली होती. त्यामुळे बाजार पेठ पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी सुरक्षा पुरवली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये अन् कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

पोलिसांकडून कुटुंबियांची चौकशी

कल्याण-गुन्हे शाखेचे पथक जयदीप आपटे यांच्या घरी दाखल झाले. तसेच सिंधुदुर्ग गुन्हे शाखेचे पथक ही त्याच्या घरी दाखल झाले. जयदीप आपटे याची पत्नी व त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली. आम्ही प्रचंड दु:खात आहोत. आमची बोलण्याची मानसिकता नाही, असे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले आहे.

संभाजी ब्रिगेडने केले होते आंदोलन

जयदीप आपटे याच्या घरावर संभाजी ब्रिगेडने गुरुवारी आंदोलन केले होते. आपटेच्या घरावरती अंडी मारत, शिवद्रोही असे पोस्टर चिपकवले होते. तसेच दरवाजावर लाथा मारत संभाजी ब्रिगेडकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी घरात कोणीही नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान, या प्रकरणावरुन राज्यभरात अनेक ठिकाणी शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात आले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;