Gold Smuggling : मुंबईतील कारवाईत सोन्याचे घबाड, 17 कोटींचे सोने केले जप्त, दोन महिलांसह साथीदाराला अटक, काय आहे अपडेट

Gold Smuggling : मुंबईतील कारवाईत सोन्याचे घबाड, 17 कोटींचे सोने केले जप्त, दोन महिलांसह साथीदाराला अटक, काय आहे अपडेट

मुंबईत महलूस गुप्तवार्ता विभागाने केलेल्या कारवाईत मोठे घबाड मिळाले. या कारवाईत 17 कोटींचे सोने जप्त करण्यात आले आहे. मोठ्या शिताफीने ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोन्याची तस्करी उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रकरणात आतापर्यंत दोन महिला आणि त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. आरोपींविरोधात सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

23 किलो सोने हस्तगत

तस्करीतील 17 कोटींचे सोने बाळगणाऱ्या तिघांना या कारवाईत अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. मुंबई सेंट्रल येथे महसुल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईत तस्करीतील सोने लपवण्यासाठी जाणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून 23 किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे. बाजारातील किंमत सुमारे 17 कोटींच्या घरात आहे. गिरगाव फणसवाडी येथून मुंबई सेंट्रल येथे सोने घेऊन जात असताना आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी आणखी एका आरोपीचा सहभाग उघड झाला आहे.

सोने लपवण्याअगोदरच भांडाफोड

आरोपी सोने लपवण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी सर्व योजना आखली होती. त्याअगोदरच त्यांच्यावर कारवाई झाली. पायल जैन(39), पंखुदेवी माली(38), राजेश कुमार जैन(43) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यातील पंखुदेवी भुलेश्वर येथील रहिवासी आहे,. तर पायल व राजेश दोघेही मुंबई सेंट्रल येथील रहिवासी आहेत. राजेश आणि त्याचा साथीदार रमेश यांच्या माहितीनुसार, हे तिघेही फणसवाडी येथून सोने घेऊन मुंबई सेट्रल येथील घरी ठेवण्यासाठी घेऊन जात होते.

सापळा रचून केली कारवाई

त्याबाबतची माहिती डीआरआयला मिळाली. त्यानुसार डीआरआयने सापळा रचला. तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅगेच्या झडतीत 22.89 किलोग्रॅम तस्करी केलेले सोने सापडले. याशिवाय तस्करी केलेल्या सोन्याच्या विक्रीच्या उत्पन्नाचे 40 लाख रुपये घरात लपवले होते.
ती रक्कमही हस्तगत करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत 16 कोटी 91 लाख रुपये आहे. आरोपींविरोधात सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे. तिघांना पण अटक करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;