कुविख्यात गुंड गजानन मारणेने केलं चंद्रकांतदादांचं स्वागत, विजय वडेट्टीवार म्हणाले, हे तर लाडके…

कुविख्यात गुंड गजानन मारणेने केलं चंद्रकांतदादांचं स्वागत, विजय वडेट्टीवार म्हणाले, हे तर लाडके…

कुख्यात गुंड गजानन मारणे यांनी दहिहंडीच्या पुण्यातील कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली. त्याने यावेळी चंद्रकांत दादांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी यावेळी पुष्पगुच्छ स्वीकारला. त्यावरुन आता काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आता या मुद्दावरुन मंत्रिमहोदयांवर चांगलेच तोंडसूख घेतले. त्यांनी भाजपला चिमटा काढला.

व्हिडिओ केला सोशल मीडियावर शेअर

याप्रकरणात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील आणि गुंड गजानन मारणे यांच्यासंबंधीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात मारणे हा मंत्रिमहोदयांना पुष्पगुच्छ देताना दिसत आहे. एका दहिहंडी कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ वडेट्टीवार यांनी शेअर केला आहे.

विजय वडेट्टीवार यांचे ट्वीट काय

‘लाडके गुंड‘ या नावाने त्यांनी हे ट्वीट केले आहे. त्यानुसार, ‘कुख्यात आणि महायुती सरकारचा लाडका गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दहीहंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मंत्री महोदयांनी देखील पुष्पगुच्छ स्वीकारून गजानन मारणेला हात जोडले.’ असे ट्वीट त्यांनी केले.

हा तर गुंडाला राजाश्रय

पुण्यातील कोथरूड भागात असलेला गजानन मारणे, त्याच कोथरुडमधील आमदार चंद्रकांत पाटील. लोकप्रतिनिधी हे जनतेसाठी असतात पण परत निवडून येण्यासाठी आजच्या परिस्थितीत महायुतीला लाडके गुंड महत्वाचे आहे म्हणून सत्कार चमत्कार गुंडाकडून घेतले जात आहे.या भागातील नागरिकांना अश्या गुंडपासून संरक्षण देणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी असताना मंत्री महोदय गुंडाला ‘राजाश्रय‘ देत आहे.

भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार यांनी आणि त्यांच्या मुलाने पोलिसांची इज्जत कशी काढली हे काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्राने live पाहिले. पोलिसांना धमकावण्याचा असा माज खासदार नारायण राणे आणि त्यांचा मुलगा निलेश राणे यांना कुठून आला हा प्रश्न जनतेला पडला होता. त्याचे उत्तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले आहे. या राज्यात पोलिसांची इज्जत राहिली नाही. मंत्री गुंडांकडून सत्कार करून घेतात, आमदार पोलिसांना शिवीगाळ करतात, धमकावतात.

जिथे गुंडांना राजाश्रय मिळत आहे तिथे सामान्य जनतेने आपले रक्षण होईल या भाबड्या आशा ठेवू नये. गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या या सरकारला आता जनतेने पुष्पगुच्छ देऊन निरोप द्यावा हीच राज्यातील जनतेला विनंती, असे ट्वीट विजय वडेट्टीवार यांनी केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;