Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : महाविकास आघाडीच्या अंतर्गत सर्व्हेत ठाकरे तिसऱ्या नंबरवर? पाहा Video

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : महाविकास आघाडीच्या अंतर्गत सर्व्हेत ठाकरे तिसऱ्या नंबरवर? पाहा Video

दोन ते अडीच महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्याआधी, महाविकास आघाडीनं अंतर्गत सर्व्हे केलाय. त्यानुसार महाविकास आघाडीला बहुमत मिळत असून काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक 85 जागा मिळण्याचा अंदाज आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 55-60 जागा मिळू शकतात. तर ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर राहणार असून 32 – 35 जागाच मिळण्याची शक्यता सर्व्हेतून वर्तवण्यात आलीय.

दुसरीकडे, महायुतीचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या सर्व्हेत भाजपला 55 जागा मिळतील असा अंदाज आहे. शिंदेंच्या शिवसेनेचा 33 आमदार तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 18 आमदार निवडून येतील असं भाकीत वर्तवण्यात आलंय. महाविकास आघाडीच्या सर्व्हेची आकडेवारी पाहिली तर महाविकास आघाडी स्पष्ट बहुमतासह सत्तेत येताना दिसतेय.

पाहा व्हिडीओ:-

महाविकास आघाडीचा आकडा जातोय, 172-180वर आणि महायुतीचा आकडा हा 106वरच थांबताना दिसतोय. भाजपचा विचार केला तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाजपनं मिशन 125 ठेवल्याची माहिती आहे. 50 जागांवर विजय निश्चित असल्याचं भाजपला वाटतंय तर 75 जागांवर निवडून येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असा भाजपचं अॅनेलिसिस आहे.

महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक सुरु झालीय. महायुतीची बैठक अद्याप सुरु झालेली नाही. मात्र लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमातून महायुतीनं जोरदार प्रचार सुरु केलाय. त्याचवेळी मविआच्या सर्व्हेनं काँग्रेससाठी आत्मविश्वास वाढवणारी बाब असली, तरी ठाकरेंसाठी चिंता वाढवणारे आकडे आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;