RSS BJP : विधानसभा काबीज करण्यासाठी संघाचा प्रचारासाठी खास मंत्र, भाजपच्या वरिष्ठांना समजावून सांगितले हे तंत्र

RSS BJP : विधानसभा काबीज करण्यासाठी संघाचा प्रचारासाठी खास मंत्र, भाजपच्या वरिष्ठांना समजावून सांगितले हे तंत्र

विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. सर्वच राजकीय पक्ष त्यासाठी कामाला लागले आहेत. यात्रा, सभा आणि आंदोलनाचा धडाका सुरु आहे. थेट जनतेत जाऊन ब्रँडिंग करण्याची एक संधी सुद्धा राजकीय पक्ष सोडताना दिसत नाही. यावेळी भाजपला संघाचे बळ मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपबाबत संघाने तटस्थ भूमिका घेतली होती. झारखंड येथील पक्ष मेळाव्यात जे.पी. नड्डा यांनी केलेल्या विधानाची ही प्रतिक्रिया होती. पण विधानसभेसाठी भाजप-संघात दिलजमाई झाली आहे. विधानसभा काबीज करण्यासाठी संघाने भाजपला तंत्र आणि मंत्र दिला आहे.

लोकसभेनंतर भाजपने दूर केली नाराजी

लोकसभा निवडणूक एक हाती जिंकण्याचा भाजपचा विश्वास होता. पण काही राज्यात त्यांना जबरदस्त फटका बसला. त्यानंतर भाजपने संघाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात यश आले. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री राजनाथ सिंह, अमित शाह आणि संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, सहकार्यवाह अरुण कुमार, संघटना महासचिव बी. एल. संतोष यांच्यात दिल्लीत एक बैठक झाली. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली.

तरुण चेहऱ्यांना द्या स्थान

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी सध्याच्या नेतृत्वासोबतच नवीन चेहऱ्यांना पण निवडणूक प्रचारात उतरवण्याची आग्रही मागणी संघाने भाजपकडे केली आहे. नवीन चेहरामुळे वातावरण निर्मिती होण्यास मदत होणार आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांना निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती दिली आहे. पण आता भाजपने या प्रक्रियेत हस्तक्षेप करत स्थानिक नेतृत्वासह नवीन चेहऱ्यांना पण संधी देण्याची आग्रही मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संघाची भूमिका महत्वाची

निवडणूक प्रक्रियेत भाजप आणि संघात बैठका होतात. पण या लोकसभेवेळी भाजप-संघात अशी बैठक झाल्याचे दिसून आले नाही. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने विधानसभेसाठी भाजप-संघात समन्वयाची सुरुवात झाली. त्यानुसार गेल्या आठवड्यात दिल्लीत भाजप-संघात बैठकांचे सत्र सुरु झाले. त्यानुसार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत संघ संघटनात्मक दृष्ट्या पण सक्रिय भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;