मुंबईतील दहीहंडी उत्सवात 238 गोविंदा जखमी, दोघांची प्रकृती गंभीर; कोणत्या रुग्णालयात किती गोविंदा दाखल? महापालिकेने दिली माहिती

मुंबईतील दहीहंडी उत्सवात 238 गोविंदा जखमी, दोघांची प्रकृती गंभीर; कोणत्या रुग्णालयात किती गोविंदा दाखल? महापालिकेने दिली माहिती

Mumbai Govinda Injury Report : मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव पार पडला. मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंचच उंच दहीहंडी फोडण्यासाठी पथकांमध्ये चुरस रंगल्याचे पाहायला मिळाले. मुंबईत मोठ्या जल्लोषात दहीहंडी उत्सव पार पडत असताना दुसरीकडे थरावरुन कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाले आहेत. त्यामुळे दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. मुंबईसह ठाण्यात आतापर्यंत 238 गोविंदा जखमी झाले आहेत. या गोविंदांवर सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडलेल्या दहीहंडी उत्सवात आतापर्यंत 238 गोविंदा जखमी झाले आहेत. यातील 2 जणांवर ओपीडीमध्ये उपचार सुरु आहेत. तर 204 गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ठाण्यात 19 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जखमी गोविंदांचा अहवाल जाहीर

मुंबईसह ठाण्यात सुरु असलेल्या दहीहंडी उत्सवादरम्यान थरावरुन कोसळून गोविंदा जखमी होतात. त्यामुळे या गोविंदांसाठी आरोग्य सेवा सज्ज ठेवण्यात आली होती. यंदाही थरावरुन कोसळून काही गोविंदा जखमी झाले. या गोविंदांवर केईएम, नायर, शीव, कूपर आणि इतर प्रमुख रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. आता नुकतंच मुंबई महापालिकेकडून जखमी गोविंदांचा अहवाल जाहीर करण्यात आला. त्यात कोणत्या रुग्णालयात किती गोविंदा दाखल आहेत, याची माहिती समोर आली आहे.

कोणत्या रुग्णालयात किती गोविंदा दाखल?

मुंबईत आज सकाळी 6 वाजेपर्यंत विविध पथकातील 238 गोविंदा जखमी झाले आहे. या सर्व गोविंदांवर महापालिकेच्या तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात मुंबईतील केईएम रुग्णालयात 52, नायर रुग्णालयात 12, सायन रुग्णालयात 20, सेंट जॉर्ज हॉस्पिटलध्ये 08, जी टी हॉस्पीटल 05, पोद्दार रुग्णालय 18, राजावाडीमध्ये 13, एमटी अगरवाल रुग्णालयात 02 आणि कुर्ला भाभा रुग्णालयात 05 रुग्णावर उपचार सुरु आहेत. तसेच जे.जे हॉस्पिटल 04, वीर सावरकर रुग्णालय 03, शताब्दी गोवंडी रुग्णालय 13, वांद्रे भाभा रुग्णालय 09, ट्रॉमा केअर रुग्णालय 21, व्ही एन देसाई हॉस्पिटल: 29, MW देसाई हॉस्पिटल 02, कूपर हॉस्पिटल 03, BDBA रुग्णालय 18, लीलावती रुग्णालयात एका गोविंदावर उपचार सुरु आहेत.

दोन गोविंदांची प्रकृती गंभीर

यात केईएम रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन गोविंदांची प्रकृती गंभीर आहे, तर सेंट जॉर्जेस रुग्णालयात दोन बालगोविंदा जखमी झाले आहेत. उपचार घेत असलेल्या गोविंदांमध्ये काहींना गंभीर दुखापती झाल्या आहेत. तर काहींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. मुंबईसह ठाण्यातही 19 जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत एकूण 238 जखमी गोविंदाची नोंद करण्यात आली आहे. यातील 32 गोविंदा अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे. यातील दोन जणांवर ओपीडीमध्ये उपचार सुरु आहेत. तर 204 गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;