Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बदलापूर अत्याचार प्रकरणातील FIR गायब, पाहा Video

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : बदलापूर अत्याचार प्रकरणातील FIR गायब, पाहा Video

बदलापुरातील नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतीलच सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. त्या चिमुकल्या जिवांचे आई-वडील तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्यानंतर पोलीस ठाण्यात त्यांना 12-12 तास बसवून ठेवण्यात आलं. त्यावरुन बदलापूरसह संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले. 20 ऑगस्टला बदलापूरकरांनी तब्बल 11 तास रेल रोको करत सरकारला धारेवर धरलं. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणात आता काही धक्कादायक माहिती आता समोर येतेय. पीडितेची बाजू मांडण्यासाठी अॅड. असीम सरोदे यांनी कल्याण कोर्टात वकीलपत्र सादर केलंय. त्यावेळी बोलताना आरोपीला वाचवण्यासाठी तो गतीमंद असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गंभीर आरोप सरोदे यांनी केलाय. इतकंच नाही तर पोलिसांची कारवाई राजकीय हेतूने पुरस्कृत असल्याचंही सरोद यांनी म्हटलंय.

दुसरीकडे या प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराबाबत अश्लाघ्य भाषेचा वापर करणाऱ्या शिंदे गटाच्या वामन म्हात्रे यांच्यावरील FIR गायब असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय. महाराष्ट्र पोलिसांच्या CCTNS या संकेतस्थळावरुन FIR गायब झालाय. त्यामुळे यामागचं गौडबंगाल काय? याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झालीय.

पाहा व्हिडीओ:-

दरम्यान, बदलापूर अत्याचार प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाण्यातील निवासस्थानी बैठक बोलावली. मुख्यमंत्र्‍यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून संपूर्ण तपासाची माहिती घेतली. आरोपीची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टानं आरोपीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी आता आधारवाडी तुरुंगात करण्यात आलीय. मात्र, या प्रकरणातील धक्कादायक माहिती आता समोर येत असल्यानं पोलीस तपासावर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;