संजय राऊतांकडून माझा पाठलाग, फोन करून…; ‘दादा’ म्हणत महिलेचं उद्धव ठाकरेंना पत्र

संजय राऊतांकडून माझा पाठलाग, फोन करून…; ‘दादा’ म्हणत महिलेचं उद्धव ठाकरेंना पत्र

बदलापूरमध्ये शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा समोर आल्यानंतर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत आवाज उठवला. महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तोंडाला काळा मास्क लावत दादरमधील शिवसेनाभवन समोर निषेध आंदोलन केलं. त्यानंतर आता महिला सुरक्षेबाबत उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिण्यात आलं आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत.

स्वप्ना पाटकर यांचं पत्र

नमस्कार उद्धवदादा,

महिला सुरक्षितते बद्दल तुम्हाला बोलताना ऐकून खूप आनंद झाला. “नराधमांना तर शिक्षा झालीच पाहिजे, पण त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनासुद्धा शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांवर दबाव आणला असेल, तर दबावाखाली आलेले पोलीस सुद्धा नराधमांएवढेच विकृत आहेत.” असे तुमचे ट्विट वाचून बरं वाटले.

मी 2016 ते 2021 तुम्हाला अनेक ईमेल लिहिले. सत्य परिस्थिती कळवली. संजय राऊत कसे माझा पाठलाग करत होते, मला धमकावत होते आणि त्यांच्या शिवाय इतर कोणा सोबत काम करू देणार नाही असं म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न करत होते, हे मी फार स्पष्ट आपल्याला कळवले होते. माझावर हल्ले झाले, मला वेग वेगळ्या पोलीस स्टेशनला संबंध नसताना बोलावले जायचे, माझे काम बंद करण्यात आले, घरा बाहेर काढणार हा दबाव टाकला गेला. सगळे माहित असून तुम्ही काहीच मदत केली नाही. याचे मात्र मला वाईट वाटले.

माझा एक चित्रपट ” डॉक्टर रखमाबाई “रिलीज होऊ दिला नाही. माझे आणि अनेक कलाकारांचे प्रचंड नुकसान तुम्ही केले असे मला राऊत यांच्याकडून सांगण्यात आले. पण मला वाटत नाही तुम्ही असं कराल. त्यांनीच केले हे मला माहित आहे. फोन वर शिव्या गाळ, घर उध्वस्त केले, काम बंद करून जगण्याचे साधन संपवले. हे सगळे माहित असून देखील तुम्ही त्यांना पूर्ण शिवसेना हातात दिली. आणि त्यांनी माझी वाट लावली तशीच पक्षाची वाट लावली. असो. आता तुम्ही बहीणी साठी लढायला तयार आहात म्हणून विचारते. या बहिणीसाठी तुम्ही काय करणार ते महाराष्ट्राला नक्की सांगा. मी वाट पाहत आहे. तुमची लाडकी बहीण, स्वप्ना पाटकर.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;