पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, नाशिकच्या ‘गोदावरी’ला पूर; महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस

पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, नाशिकच्या ‘गोदावरी’ला पूर; महाराष्ट्रभरात मुसळधार पाऊस

बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस होतोय. पुण्यातही जोरदार पाऊस होतोय. डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. पुणे शहरासह जिल्हा, सातारा आणि रायगडला आज हवामान खात्याने रेड अलर्ट दिला आहे. नाशिक, जळगाव, पालघर, ठाणे रत्नागिरी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज सकाळपासून शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये देखील काल रात्रीपासून पाऊस होतोय. त्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. तसंच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर नाशिक, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होतोय.

पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रात रिमझिम पाऊस सुरू आहे. खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रात 35 हजार 310 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पुणे शहरासह जिल्हा आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. काल संध्याकाळपासून खडकवासला धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग मुठा नदीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

नाशकात पूर

नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा पूर येण्याची चिन्हे आहेत. नाशकातील पुराचे इंडिकेटर समजल्या जाणाऱ्या दुतोंडा मारुतीच्या छातीला पाणी लागलं आहे. रामकुंड परिसरातील अनेक मंदिर पाण्याखाली गेली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 8428 क्युसेस वेगाने सुरू नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

कोल्हापुरात मुसळधार पाऊस

राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा पहाटे उघडला आहे. सहा नंबरच्या स्वयंचलित दरवाज्यातून 1400 क्युसेकने विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. सध्या कोल्हापूर आणि परिसरात पावसाची उघडीप आहे. मात्र धरण क्षेत्रात अधून मधून पावसाच्या सरी बरसत आहेत.

नागपुरात सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. पूर्णतः ढगाळ आणि पावसाचं वातावरण आहे. नागपूरसह परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्या पासून नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;