महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात किती महिलांवर अत्याचार? राज ठाकरेंनी कुंडलीच मांडली, म्हणाले “2023 मध्ये…”

महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात किती महिलांवर अत्याचार? राज ठाकरेंनी कुंडलीच मांडली, म्हणाले “2023 मध्ये…”

Raj Thackeray Maharashtra Rape Case : बदलापूरला दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात असंख्य महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे राज्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या 5 वर्षात महिलांवर झालेल्या अत्याचारांची आकडेवारीच वाचून दाखवली आहे. या आकडेवारीमुळे महाराष्ट्रातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

राज ठाकरे हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहे. राज ठाकरे आज अमरावती, नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी 2017 पासून 2023 पर्यंत किती अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली, याबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच यावेळी त्यांनी मुंबईत विनयभंगांचे सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ पुणे आणि नागपुरात बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, विनायभंग, अनैतिक व्यापार याबद्दलच्या गुन्ह्यांची नोंद अधिक आहे.

मुंबईत विनयभंगांचे सर्वाधिक गुन्हे

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची माहिती आहे. शासनाने अनेक योजनांच्या घोषणा केल्या. त्यानंतरही महिलांवर अत्याचार होत आहे. २०२३-२०२४ च्या आकडेवारीनुसार मुंबईत विनयभंगांची सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले आहे. त्यानंतर पुणे, नागपुरातील गुन्हे अधिक आहेत. बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, विनायभंग, अनैतिक व्यापार आदी गुन्हे घडत आहेत.

राज ठाकरेंनी सांगितलेली आकडेवारी

  • २०१७ मध्ये राज्यात ४३२० बलात्कार झाले
  • २०१८ मध्ये राज्यात ४९७४ बलात्कार झाले
  • २०१९ मध्ये राज्यात ५४१२ बलात्कार झाले
  • २०२० मध्ये राज्यात ४८४६ बलात्कार झाले
  • २०२१ मध्ये राज्यात ५९५४ बलात्कार झाले
  • २०२२ मध्ये राज्यात ७०८४ बलात्कार झाले
  • २०२३ मध्ये राज्यात ७५२१ बलात्कार झाले

एवढी प्रकरणाची नोंद पोलीस स्टेशनला आहे. महाराष्ट्रातील या आकडेवारीनुसार दर तासाला एक गंभीर गुन्हा नोंदवला जातो. हे केवळ नोंद झालेले गुन्हे आहेत. नोंद नसलेले गुन्हे अधिक असतील. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशात खालोखाल अधिक प्रकरणे आले आहेत. राज्यात २०१९ ते २०२१ या काळात १८ वर्षीय आणि त्याहून अधिक वयाच्या महिला बेपत्ता झाल्याची १ लाख ८४२ प्रकरणे आहेत. शहाजी जगताप यांनी याचिका दाखल केली होती. त्यातूनही ही आकडेवारी आली आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

एका केसला एवढा विलंब होत असेल, तर काय करायचं?

“बीड आणि सांगलीत ऊसतोड कामगार महिलांच्या न कळत गर्भाशये काढली जाण्याची प्रकरणे समोर आली आहे. कामात सुट्ट्या घेऊ नये म्हणून त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. या दोन जिल्ह्यात रोज एक प्रकरण येतं. रोज काय तासाला यायला पाहिजे ना. म्हणजे राज्यात प्रत्येक पोलीस स्टेशनला असे किती गुन्हे दाखल होत आहे. जे इतके दिवस दाखवले जात नव्हते ते आता दाखवले जात आहे. आता आपल्याकडे अजूनही कठोर कायदा होत नाही. दिल्लीत निर्भया प्रकरण झालं. कोण कळलं किती बलात्कार झाला हे कळलं. त्याला फाशी १२ वर्षाने झाली. एका केसला एवढा विलंब होत असेल तर यांचं काय करायचं सांगा?” असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.

“या सर्व गोष्टी जे बंद पुकारला होता त्यांच्याही काळात आहे. आजही आहेत. आता जे रोजच्या रोज सुरू आहे. आज इथे झाला इथे झाला त्यामागे काही निवडणुका आहेत का? त्या मागे येणाऱ्या निवडणुका आहेत का? आपल्याला विषय काय तर ही गोष्ट राज्यात होऊ नये ही महत्त्वाची आहे. निवडणुका आल्यावर सरकारला बदनाम करा. यांच्याही काळात होतंच की. लॉकडाऊन काळात त्यांचं सरकार होतं. तेव्हाही प्रकरण होतेच की”, असेही राज ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;